Pune Land Scam: पुण्यात 37 कोटींच्या जमीन व्यवहारातील फसवणूक; शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचे नाव समोर

आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास तीव्र; जमीन व्यवहार प्रकरणाला नवे वळण
Nana Bhangire
Nana BhangirePudhari
Published on
Updated on

पुणे: महंमदवाडी परिसरातील कोट्यवधींच्या जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात आता शिवसेना (शिंदे गट) शहराध्यक्ष प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांचे नाव निष्पन्न झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Nana Bhangire
Pune Grape Market: गुलटेकडी मार्केट यार्डात द्राक्षांची आवक वाढली; गोडी वाढल्याने मागणीही तेजीत

या प्रकरणात राजेंद्र सीताराम गोयल, जयेश पुरुषोत्तम पटेल, विपुल वल्लभ पटेल, पूनम रुफिंगचे संचालक वल्लभभाई पटेल, पुरुषोत्तम पटेल, चेतन पुरुषोत्तम पटेल, सत्यन वल्लभ पटेल, जिगनेश वल्लभ पटेल, नाना भानगिरे आणि सिद्धांत भानगिरे अशांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विश्वजित सुभाष झंवर यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून 24 जानेवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Nana Bhangire
Pune Low Emission Zone: पुण्यात ‘लो इमिशन झोन’चा विचार; शिवाजीनगर-पेठ भागात जुन्या वाहनांवर प्रदूषण शुल्क

आरोपींनी फिर्यादी यांच्याशी मौजे महंमदवाडी येथील जमीन विकसनासाठी करार केला होता. या बदल्यात फिर्यादीकडून 22 कोटी रुपये संस्थेच्या खात्यात स्वीकारले. मात्र, करारानुसार आवश्यक असलेले एस्क्रो खाते उघडण्यास आणि जमिनीचे निर्वेध मालकी हक्क करून देण्यास आरोपींनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली.

उलट फिर्यादींना या जागेवर प्लॅन सँक्शन आणि कमेन्समेंट सर्टिफिकेटसाठी सुमारे 15 कोटी 48 लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडले. अशाप्रकारे गेल्या 14 वर्षांपासून फिर्यादीची एकूण 37 कोटी 48 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

Nana Bhangire
Pune Municipal Hospitals PMJAY: पुण्यातील महापालिका रुग्णालयांना ‘फुले’ आणि ‘पीएमजय’ योजनेचा आधार

परस्पर विक्री आणि थर्ड पार्टी इंटरेस्टचा बनाव तपासात सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादीसोबतच अधिकृत करार अस्तित्वात असतानाही आरोपींनी सर्व्हे नं. 18/1/1 मधील 12 गुंठे जमीन परस्पर नाना भानगिरे यांना विकली. विशेष म्हणजे, या व्यवहारासाठी कोणताही मोबदला घेतला गेला नव्हता, असे तक्रारीत नमूद आहे.

केवळ फिर्यादीचा हक्क डावलण्यासाठी आणि थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी हा व्यवहार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासात फास आवळताच 96 लाखांचा बनाव या प्रकरणाची पोलिस चौकशी सुरू झाल्यानंतर हा बेकायदेशीर व्यवहार कायदेशीर दाखविण्यासाठी 28 डिसेंबर 2025 रोजी आरोपींनी भानगिरे यांच्याकडून 96 लाख रुपये स्वीकारल्याचे दाखविले. मात्र, मूळ खरेदीखतावेळी कोणताही पैसा दिला नसल्याने तक्रारीतून समोर आले आहे.

Nana Bhangire
Lonikand Dowry Death: लोणीकंदमध्ये हुंडाबळीचा धक्कादायक प्रकार; छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांचा माझा कधीही संबंध आलेला नाही. बारा गुंठ्यांचा झालेला व्यवहार क्लीअर आहे. त्यासाठी चेकने व्यवहार झालेले आहे,. याबाबतचे व्यवहार देखील आर्थिक गुन्हे शाखेला कागदोपत्री दाखविले आहेत. माझा या गुन्ह्याशी संबंध नसताना मला राजकीय दृष्ट्‌‍या कोणाकडून तरी विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय आहे.

प्रमोदनाना भानगिरे, शहराध्यक्ष शिवसेना (शिंदे गट)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news