

Pune Kothrud shooting case news
पुणे: कोथरूड परिसरात किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी घायवळ टोळीतील 5 जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आनंद चांडलेकर, मयूर कुंभारे, मुसा शेख ,रोहीत आखाड, गणेश राऊत अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रकाश धुमाळ (वय ३६) असून, तो या घटनेत किरकोळ जखमी झाला आहे. गोळीबार झालेल्या ठिकाणावरून आढावा घेतला असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याप्रकरणी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती देताना म्हटले आहे की, "ही घटना बुधवारी (दि.१७) रात्री कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी केवळ गोळीबार नाही केला तर अजून एकाला कोयत्याने मारहाण देखील केली असल्याचे ते म्हणाले".
पुढे बोलताना पोलीस आयुक्त कदम म्हणाले, "बुधावरी (दि.१७) रात्री या आरोपींनी दोन जणांना मारहाण केली आहे. दरम्यान रात्री १२ वाजता कोथरूड परिसरात हा गोळीबार घडला आणि त्यानंतर याच आरोपींनी अजून एका व्यक्तीला कोयत्याने मारहाण केली आहे. प्रकाश धुमाळ असं गोळीबार झालेल्याचं नाव आहे. तर वैभव साठे याला कोयत्याने मारहाण केली. चार आरोपी दोन गाड्यांवर आले आणि गोळीबार केला. आम्ही इथले भाई आहोत म्हणत गोळीबार केला. एक गोळी फायर केली होती आणि ती त्या इसमाच्या मांडीवर लागली. याच आरोपींनी रात्री अजुन एकाला कोयत्याने मारहान करत जखमी केल. हे सगळे घायवळ टोळीचे आरोपी आहेत.
कोथरूड गोळीबार प्रकरणातील सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी देखील मोका आणि ३०७ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. बुधवारी रात्री घटलेल्या घटनांप्रकरणी सर्व ५ आरोपींवर २ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांमध्ये निलेश घायवळ याचा काही सहभाग आहे का? याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. मयूर कुंबरे, गणेश राऊत, रोहित आखाडे, मुसा शेख आणि इतर काही आरोपींवर गुन्हा दाखल असून यांना ताब्यात घेतले आहेत. मारणे टोळीवर याआधी मोका लावला आहे यात देखील योग्य कारवाई करण्यात येईल, असे देखील पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे,