पुणे : ‘कोकणचा राजा’ स्वस्ताईकडे…

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'कोकणचा राजा' असलेल्या हापूसचे नाव काढताच लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. मधुर चव व रसाळ गुणधर्म असलेल्या हापूस आंब्याची कोकणातून आवक वाढू लागली आहे. परिणामी, मागील काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेला आंबा आता आवाक्यात येण्यास सुरवात झाली आहे.  सध्या बाजारात एक डझन तयार हापूस 700 ते 1000 रुपये या दराने उपलब्ध आहे. 9 एप्रिल रोजी गुढी पाडवा आहे, तोपर्यंत आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, असा अंदाज व्यापार्‍यांकडून वर्तविण्यात येत आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळविभागात पंधरा दिवसांपूर्वी येथील बाजारात दोन ते तीन हजार पेटी हापूसची आवक होत होती. यामध्ये वाढ होऊन आता 4 ते 5 हजार पेटी आवक होत आहे. मंगळवारी (दि. 26)  5 हजार पेट्यांची आवक नोंदविण्यात आली. बाजारात दाखल होणार्‍या 4 ते 7 डझनाच्या पेटीस दर्जानुसार 2 ते 4 हजार रुपये भाव मिळत आहे. तयार मालाला डझनासाठी 700 ते 1 हजार रुपये मोजावे लागत आहेत. बाजारात दाखल झालेला आंबा चांगल्या प्रतीचा आहे.  येत्या 10 ते 15 दिवसांत आंबा सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
हापूस आंब्याच्या आवकेसह त्याच्या मागणीतही वाढ होऊ लागली आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा उपलब्ध झाल्याने मागील वीस दिवसांच्या तुलनेत त्याच्या भावात तीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. ग्राहकांकडून आंब्याला मागणी वाढली आहे. येत्या काही दिवसांत आणखी मागणी वाढेल.
– युवराज काची, रत्नागिरी हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news