Panchganga pollution : पंचगंगा प्रदूषणाचा धोका वाढणार

पंचगंगा प्रदूषणाचा धोका वाढणार
पंचगंगा प्रदूषणाचा धोका वाढणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पंचगंगेच्या प्रदूषणाचा Panchganga pollution धोका वाढण्याची शक्यता आहे. धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचे करण्यात आलेले नियोजन, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत होणारी घट, यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढण्याची भीती आहे.

जिल्ह्यात गतवर्षी सरासरीच्या अवघा 56 टक्केच पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत तब्बल 44 टक्के कमी पाऊस झाल्याने धरणे भरल्यानंतरही ऑक्टोबर महिन्यापासूनच सिंचनासाठी पाणी सोडण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा Panchganga pollution कमी होत चालला आहे. राधानगरी धरणात सध्या 3.78 टीएमसी पाणीसाठा आहे. यापैकी 30 जूनपर्यंत केवळ 0.39 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे.

या सर्वांचा विचार करता पंचगंगा नदीतून प्रवाहित Panchganga pollution होणारे पाणी आणि त्यामुळे नदीची एप्रिल आणि मे महिन्यात पाणी पातळी कमी राहील अशी शक्यता आहे. पाणी पातळी कमी झाल्याने प्रदूषण वाढीचा धोका अधिक आहे. पंचगंगेत कोल्हापूर शहरातून मिसळणार्‍या सांडपाण्यावर जून महिन्यापर्यंत योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. एखादा मोठा वळीव झाला, अथवा वीज पुरवठा खंडित झाला किंवा तांत्रिक बिघाड झाला तर विनाप्रक्रिया पाणी पंचगंगेत मिसळण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सांडपाणी प्रक्रिया होणारे सर्व नाल्यांतील कचरा दैनंदिन काढणे आवश्यक आहे. याकरिता आतापासूनच नालेसफाई आवश्यक आहे. नाल्यातील गाळ काढून त्याचे खोलीकरण, रुंदीकरण  Panchganga pollutionआवश्यक आहे. यामुळे मोठा पाऊस झाला, वीजपुरवठा खंडित झाला अथवा काही तांत्रिक बिघाड झाला तरी नाल्यातील पाणी ओव्हरफ्लो होऊन थेट नदीत मिसळण्याची शक्यता कमीत कमी राहील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news