Khed Police Action : खेड पोलिसांची धडक कारवाई! १३ सराईत गुन्हेगार तडीपार, दोघांवर MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

Police
PolicePudhari
Published on
Updated on

राजगुरुनगर : खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील एकूण १३ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, दोन धोकादायक व्यक्तींना एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील एकूण १२ गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडे पाठविण्यात आले होते. तसेच एका गुन्हेगाराचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, खेड उपविभाग यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.

Police
Maharashtra Resident Doctors Strike : महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप तीव्र, गुरुवारपासून तातडीची सेवा बंद करण्याचा इशारा

त्यानुसार पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी खालील १२ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे - मनोज माणिक हजारे, निखील नवनाथ गोगावले, राकेश पांडुरंग हजारे, गणेश दत्तात्रय गावडे, गौरव राम हजारे

(सर्व रा. कनेरसर, ता. खेड) तसेच रोहन उर्फ जग्गु अशोक शिंदे, सोमनाथ कुंडलिक शिंदे, दिपक दत्तात्रय सावंत, सोमनाथ उर्फ वाळके दत्तात्रय सावंत, अनिल विश्वनाथ सावंत, महेश दत्तात्रय हांडे, नवनाथ नामदेव गि-हे(सर्व रा. आंबोली, ता. खेड )

Police
Wife Maintenance Rights: पत्नी कमावती असली तरी पतीच्या दर्जानुसार जगण्याचा अधिकार; न्यायालयाकडून 40 हजारांची अंतरिम पोटगी

याशिवाय उपविभागीय दंडाधिकारी, खेड उपविभाग यांनी राजेंद्र उर्फ राजु गेणभाऊ करंडे (रा. करंडेवस्ती, राजगुरूनगर ) याला पुणे, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्याबाहेर तडीपार केले आहे. अशाप्रकारे एकूण १३ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. आणखी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

याशिवाय एमपीडीए कायद्यांतर्गत दोन धोकादायक व्यक्तींना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. यामध्ये प्रविण उर्फ डॉलर सिताराम ओव्हाळ (रा. वाळद, ता. खेड) आणि संकेत सुनिल होले (रा. राक्षेवाडी, ता. खेड ) यांचा समावेश आहे. त्यांना नागपूर व अकोला कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. आणखी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे एमपीडीए प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

Police
Home Loan Insurance Claim: वैद्यकीय तपासणीशिवाय पॉलिसी; दावा फेटाळणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका

खेड पोलीस स्टेशन हद्दीत कोणी दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देत असेल किंवा भीतीचे वातावरण निर्माण करून गुन्हे करीत असेल, अशा सराईत गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल , अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश गरड, पोलीस उपनिरीक्षक पुनाजी जाधव, सहा. पो. फौजदार शंकर भवारी, पोलीस हवालदार अमोल चासकर, विजय शेळके, मुकुंद कुडेकर, भिमा लांडे, पोलीस अंमलदार स्वप्नील लोहार, गोकुळ कोळी, रमेश दाते आणि सोमनाथ गव्हाणे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news