Pune Dam Storage: पुणेकरांनो लक्ष द्या! धरणसाठ्यात जवळपास ४ टीएमसीची तूट; खडकवासला साखळी ८४.८९ टक्क्यांवर

पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी सोडल्याने साठ्यावर परिणाम; पानशेत आणि वरसगावपाठोपाठ टेमघरमधूनही विसर्ग सुरू
Pune Dam Storage
Pune Dam StoragePudhari
Published on: 
Updated on: 

खडकवासला: पुणे शहर परिसरासह जिल्ह्यातील पिण्यासाठी तसेच शेतीसाठी खडकवासला धरणातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पानशेत, वरसगावपाठोपाठ टेमघर धरणातून खडकवासलात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरण साठ्यात जवळपास चार टीएमसीची तूट आहे.

शुक्रवारी (दि.२३) खडकवासला धरणसाखळीत २४.७४ टीएमसी म्हणजे ८४.८९ टक्के साठा होता. गेल्या वर्षी आजच्या दिवशी २३ ऑक्टोबर २०२५ रोजी धरण साखळीत २८.८७ टीएमसी म्हणजे ९९.०६ टक्के साठा होता.

जुलै-ऑगस्टमध्ये धरण साखळीत धो-धो पाऊस पडला. त्यामुळे धरण साखळी शंभर टक्के भरून वाहत होती. सर्व धरणे भरल्याने दीड महिन्यात तब्बल २६ टीएमसी जादा पाणी सोडण्यात आले. एवढे पाणी सोडूनही १३ सप्टेंबर रोजी धरण साखळीत ९९ टक्क्यांहून अधिक पाणी होते. मात्र, सप्टेंबरपासून पावसाने विश्रांती घेतली.

शेती आणि पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने धरण साठ्यात दर तासागणिक घट सुरू आहे.

Pune Dam Storage
Pune Dengue Cases: डेंग्यूने चिमुकलीच्या मृत्यूनंतर महापालिकेला जाग! आठ मृत्यूंबाबत तपासणी सुरू

खडकवासला धरणातून सध्या शहराला पिण्यासाठी बंदिस्त जलवाहिन्यांतून ६२० तर मुठा कालव्यात शेती व पिण्यासाठी ११०३ क्‍युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. याशिवाय धरणातून अनेक पाणीपुरवठा योजनांसाठी थेट पाणी दिले जात आहे. सध्या पानशेत व वरसगाव धरणातून प्रत्येकी ६०० तर टेमघरमधून २६० क्‍युसेकने पाणी खडकवासलात सोडले जात आहे.

Pune Dam Storage
Pune Dam Water Storage: मुठा कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा सुरूच; पाणीवाटपासाठी कालवा सल्लागार समितीची महिनाअखेरीस होणार बैठक

या पाण्यावर शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांसह ६६ हजार हेक्टर शेतीची तहान भागवली जात आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या गंभीर स्थितीमुळे प्रशासनाने पाणीकपात, बचत, गळती, पाणीचोरी अशा उपाययोजनावर भर दिला आहे. पिण्यासाठी पुढील वर्षाच्या ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राखीव ठेवण्यात येणार आहे.

दर गुरुवारी महापालिकेने दहा टक्के पाणी कपात सुरू केल्याने या दिवशी खडकवासला धरणातून कमी पाणी घेतले जात आहे. इतर दिवशी नेहमीप्रमाणे पाणी दिले जात आहे. तसेच, सध्या शेतीला आवर्तन सुरू आहे.

- विरेश राऊत, शाखा अभियंता, खडकवासला धरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news