Pune Dam Water Storage: मुठा कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा सुरूच; पाणीवाटपासाठी कालवा सल्लागार समितीची महिनाअखेरीस होणार बैठक

धरणात २४.५ टीएमसी जलसाठा
Pune Dam Water Storage
Pune Dam Water StoragePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड आणि हवेली या तालुक्यांना मुठा कालव्यातून एक हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने गेल्या आठवडाभरात धरणातील पाणीसाठा एक टीएमसीने कमी झाला.

चारही धरणांतील एकत्रित पाणीसाठा शुक्रवारी २४.५१ टीएमसी (८४.०८ टक्के) आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठा वाटपाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक २८ किंवा २९ ऑक्टोबरला होणार आहे.

दुष्काळी स्थिती असल्यामुळे धरणातील पाणी ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी राखून ठेवावे तसेच १६ ऑक्टोबरपासून सिंचनासाठी पाणी देऊ नये, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यानुसार जल आराखडा सादर करण्यास सांगितले आहे.

जलसंपदा विभागाने जल आराखडा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर केला. त्यानंतर डुडी यांनी बैठक घेऊन सर्वांनी १० टक्के पाणीकपात करावी, अशी सूचना केली. पुणे महापालिकेने आधीपासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू केली आहे.

Pune Dam Water Storage
Land Records Employees Salary: दिवाळी तोंडावर, पाच महिन्यांपासून पगार नाही! भूमी अभिलेख विभागातील ९०० कर्मचारी हवालदिल

त्यामुळे सध्या दहा टक्के पाणीकपात केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीमुळे १६ जुलैपासून खरीप हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात केली होती. त्या वेळी पाणी सोडू नये, असे राज्य सरकारचे आदेश होते. मात्र, जुलैअखेरीस चांगला पाऊस झाल्याने धरणे शंभर टक्के भरली. सर्वसाधारणपणे सिंचनासाठी ११ सप्टेंबरपर्यंत आवर्तन देण्याचे ठरले होते.

दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये इंदापूर, दौंड या भागांत अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यास सांगितले. त्याच वेळी, इंदापूर, दौंड या तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे.

Pune Dam Water Storage
Pune FDA Raid: ताटात विष की अन्न? महाराष्ट्रात ३.११ कोटींचा साठा जप्त; पुण्यात हजारो किलो पनीरवर कारवाई

शेतीसाठी १० टीएमसी पाणी सोडले

जलसंपदा विभागाने १६ जुलै ते २४ सप्टेंबरपर्यंत पहिले आवर्तन केल्याची नोंद केली आणि २५ सप्टेंबरपासून लगेच रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू केले. पहिल्या आवर्तनात सुमारे ६.३३ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यानंतर या महिनाभरात जवळपास अडीच ते तीन टीएमसी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे.

महिनाअखेरीस उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्या वेळी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटप कसे होणार? यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news