Pune Firing Case: पुण्यात खडक परिसरात गोळीबाराचे थरारक सत्र; दोन घटनांमध्ये सात जण अटकेत, बप्पा कसबे ताब्यात

घोरपडे पेठेत जुन्या वैमनस्यातून तर लोहियानगरमध्ये अल्पवयीनावर हल्ला; पोलिसांची तातडीची कारवाई, फरार आरोपींचा शोध सुरू
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

पुणे: खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात आरोपींना अटक केली असून एका प्रकरणातील मुख्य आरोपी बप्पा कसबे यालाही ताब्यात घेतले आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक अजित जाधव या दोघांची बदली करण्यात आले आहे.

Arrested
Branded Paneer Demand: भेसळखोरांवर कारवाईचा परिणाम! ब्रँडेड पनीरला ग्राहकांची पसंती; विक्रीत ४० टक्क्यांची वाढ

पहिल्या घटनेत घोरपडे पेठ पोलीस चौकी समोर जुन्या वैमनस्यातून ख्वाजा उद्दीन नासिर शेख (२८) आणि त्याचा नातेवाईक इम्तियाज रशीद सय्यद यांच्यावर सोनू उर्फ मॉन्टू अनिल परदेशी, पियुष उर्फ जय अनिल परदेशी, सुजल सुनील परदेशी यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी दुचाकीवर येत गोळीबार केला. ख्वाजा उद्दीन शेख याच्या पाठीत गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Arrested
Fake RAW Officer Extortion: 'रॉ अधिकारी' असल्याची बतावणी करून सव्वाचार लाखांची खंडणी; पुण्यात बनावटगिरी करणारा रंगेहाथ जेरबंद

या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सोनू उर्फ मॉन्टू परदेशी, जय उर्फ पियुष परदेशी, सुजल उर्फ चिम्या परदेशी, विकी राजू परदेशी, नितेश उर्फ बॉबी रिकीबे आणि अजय हरिसिंग परदेशी यांना अटक करण्यात आली आहे. तर यश चंदन परदेशी हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटक आरोपींपैकी पहिल्या तीन आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Arrested
Pune Ashadhi Ekadashi: ‘विठ्ठल... विठ्ठल...’च्या अखंड गजरात पुणे भक्तिरंगात; आषाढी एकादशी उत्साहात साजरी

दुसऱ्या घटनेत पहाटे लोहियानगर येथील बाबू मामडी चौकात १६ वर्षीय अल्पवयीनावर जुन्या वादातून आणि दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याच्या उद्देशाने तीन अल्पवयीन मुलांनी गोळीबार केला. त्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार करून आरोपी पसार झाले.

Arrested
Pune Farmers Loan Waiver Scheme: पुणे जिल्ह्यातील ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा; पीडीसीसी बँकेमार्फत मिळणार ५२३ कोटींचा लाभ

या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी बप्पा कसबे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास खडक पोलिस करत आहेत. तीन महिण्यापूर्वी क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news