

पुणे: पूर्वीच्या वादातून सहा ते सात जणांच्या टोळक्याने लोखंडी हत्यार आणि लाकडी काठ्याने मारहाण करत एकाच्या खुनाचा प्रयत्न केला. मारहाणीत तरुणाचा भाऊ देखील जखमी झाला आहे. हुसेन मुस्तफा कादरी (वय 27) आणि त्याचा भाऊ शब्बीर कादरी (रा. हांडेवाडी रोड) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. (Latest Pune News)
याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी हुसेन कादरी याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अमजद अफजल शेख (वय 45) याला अटक केली आहे. तर अकबर अफजल शेख (वय 40), आयान अमजद शेख (वय 22), मदत्सर सलीम शेख (वय 28), मजहर काजी (वय 28), अशपाक अफजल शेख (वय 28), जावेद बागवान व इतर अनोळखी (सर्व रा. सैय्यदनगर, महंदवाडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 26) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सैय्यदनगर गल्ली क्रमांक 07 महंमदवाडीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ शब्बीर आणि आरोपींचा काही दिवसापूर्वी वाद झाला होता. त्याच कारणातून रविवारी रात्री आरोपींनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी एकत्र करून शब्बीर याला फळाच्या गोडाऊनमध्ये जाऊन लोखंडी हत्यार आणि लाकडी काठ्याने बेदम मारहाण केली आहे. मारहाणीत फिर्यादी हुसेन हे देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर हुसनने यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी टोळक्याच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून अमजद शेख याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल सुतार करत आहेत.