Sanitation Worker Assault: कचरा टाकू दिला नाही म्हणून पालिका सफाई कामगारावर हल्ला!

येरवड्यात दोन जणांकडून सफाई कामगाराला लाथा-बुक्क्यांनी व दगडाने मारहाण; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Pune PMC Employee Attack
Pune PMC Employee AttackPudhari
Published on
Updated on

येरवडा: येरवडा येथील पर्णकुटी चौकात रात्र पाळीवर असणाऱ्या अमित प्रेम चंदा (वय ३६) या पालिका सफाई कामगारावर कचरा टाकू दिला नाही या कारणास्तव दोघांनी लाथा बुक्यानी तसेच दगडानी मारहाण करण्यात आली. यात सफाई कामगार यांच्या उजव्या डोळ्या खाली तसेच डोक्याला मार लागला आहे. शिवा शेंडकर (वय ५५ ) तसेच ऋषिकेश शेंडकर ( वय २८) यांच्या विरोधात चंदा यांनी येरवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. (Latest Pune News)

Pune PMC Employee Attack
Cultural Memorial Protest: आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारासाठी जनआक्रोश आंदोलनाला विविध पक्षांचा पाठींबा!

पर्णकुटी चौक येथील क्रॉनिक पॉईंट येथे (ता. २४) रोजी रात्रपाळी वर चंदा हे कर्तव्यावर होते. रात्री ११:३० च्या दरम्यान शिवा शेंडकर हे दुचाकीवरून सदर ठिकाणी कचरा टाकण्यासाठी आले असता. चंदा यांनी कचरा टाकू नका असे सांगितले याचा राग आल्याने शेंडकर यांनी फोन करून मुलगा ऋषिकेश शेंडकर याला बोलावून घेतले दोघांनी चांद यांना लाता बुक्क्याने तसेच दगडाने मारहाण केली. नागरिकांनी मध्यस्थी करीत भांडणे सोडवली. येरवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news