Junnar Ganja Seized | जुन्नर तालुक्यात गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला अटक

१ किलो ९०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त
Pune Junnar Farmer Arrested Cannabis
तांबे (ता. जुन्नर) येथे गांजाची लागवड करणाऱ्यावर कारवाई करून जप्त करण्यात आलेला गांजा दाखविताना जुन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीPudhari
Published on
Updated on

Pune Junnar Farmer Arrested Cannabis

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील तांबे गावात गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याविरुद्ध जुन्नर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १ किलो ९०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.४० वाजण्याच्या सुमारास तांबे येथील मुरलीधर धोंडु जोशी यांच्या घराशेजारील शेतामध्ये हिरव्या रंगाच्या नेटच्या आड गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता गांजाची झाडे आढळून आली.

Pune Junnar Farmer Arrested Cannabis
Pune HSRP Number Plate: पुण्यात 9.45 लाख वाहनांवर HSRP नंबरप्लेट; नियम मोडणाऱ्यांवर आरटीओची कारवाई सुरू

Puneया कारवाईत एकूण १ किलो ९०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मुरलीधर धोंडु जोशी (रा. तांबे, आंबेदरा वाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध एनडीपीएस अधिनियम, १९८५ मधील कलम २० (ब) (ii) (अ) व ८ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गिजरे, हवालदार महेश भालेराव तसेच पोलीस शिपाई दादा पावडे, अमोल सातपुते, कैलास केंद्रे, श्रीराम शिंदे आणि दीपक वणवे यांच्या पथकाने केली.

Pune Junnar Farmer Arrested Cannabis
Pune SC ST Atrocities Victim Aid: अत्याचारग्रस्तांना अर्थसाह्याचा विलंब टाळा; पोलिसांनी आवश्यक कागदपत्रे समाजकल्याण विभागाला द्यावीत

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जुन्नर तालुक्यात अंमली पदार्थांची लागवड, साठवणूक व विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news