Pune SC ST Atrocities Victim Aid: अत्याचारग्रस्तांना अर्थसाह्याचा विलंब टाळा; पोलिसांनी आवश्यक कागदपत्रे समाजकल्याण विभागाला द्यावीत

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत सूचना; ६० दिवसांत तपास पूर्ण करण्यावर भर, तालुकास्तरावर जनजागृती कार्यशाळांचे निर्देश
Government Scheme
Government SchemePudhari
Published on
Updated on

पुणे: कागदपत्रांअभावी पीडितांना अर्थसाह्य देण्याची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, यासाठी पोलिस विभागाकडे असलेले जातीचे दाखले, वैद्यकीय प्रमाणपत्र समाजकल्याण विभागाला उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना समितीचे सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिल्या.

Government Scheme
Pune Municipal Engineers Election Duty: मतदार यादी पडताळणीसाठी अभियंते नियुक्त; पुण्यात विकासकामे ठप्प

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची जिल्हास्तरीय बैठकीत या सूचना देण्यात आल्या. या वेळी समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. या समितीद्वारे अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ बाबत जाणीव-जागृती होण्यासाठी जातीय सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी तालुकास्तरावर कार्यशाळा घ्याव्यात, पोलिस विभागाने वस्तुस्थिती तपासून आवश्यक त्या ठिकाणी गुन्हे दाखल करावेत, उच्च न्यायालयातील प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करावा व पुढील बैठकीत उच्च न्यायालयातील प्रकरणांची संख्या सादर करावी.

Government Scheme
TET Exam: पेपरफुटीनंतर टीईटी परीक्षा आता सप्टेंबरमध्ये? ऑनलाइन परीक्षेचाही पर्याय चर्चेत

गुन्ह्यांची संख्या जास्त असलेल्या तालुक्यात संयुक्तिक बैठका घेऊन ६० दिवसांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, असे लोंढे यांनी सांगितले. बैठकीत तालुकानिहाय प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच, उपस्थित तक्रारदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news