Pune HSRP Number Plate: पुण्यात 9.45 लाख वाहनांवर HSRP नंबरप्लेट; नियम मोडणाऱ्यांवर आरटीओची कारवाई सुरू

३० जूनपर्यंत ९.४५ लाख वाहनांचे फिटमेंट पूर्ण; HSRP नसलेल्या वाहनांवर दंडासह विविध आरटीओ सेवा बंद होण्याचा इशारा
High Security Number Plate
High Security Number Platepudhari photo
Published on
Updated on

पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ, पुणे) अंतर्गत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे. आरटीओने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ३० जूनपर्यंत तब्बल ९ लाख ४५ हजार ९३७ वाहनांवर यशस्वीरीत्या या नंबरप्लेट्स बसवण्यात आल्या आहेत.

High Security Number Plate
Maharashtra Scholarship Policy: टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती योजनांत मोठे बदल; उत्पन्न मर्यादा ८ लाख, लाभार्थी संख्येवर निर्बंध

मात्र, अद्यापही अनेक वाहनधारकांनी या नंबरप्लेट्स बसवलेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर, आता आरटीओ प्रशासनाने नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास जोरदार सुरुवात केली आहे.

एचएसआरपी आकडेवारी

(दि. ३० जूनपर्यंत) - (स्रोत : आरटीओ, पुणे)

तपशील संख्या

  • एकूण ऑर्डर्स - 11,55,351

  • एकूण अपॉइंटमेंट्स -11,48,135

  • प्रत्यक्ष बसवलेल्या नंबरप्लेट्स - 9,45,937

High Security Number Plate
Pune SC ST Atrocities Victim Aid: अत्याचारग्रस्तांना अर्थसाह्याचा विलंब टाळा; पोलिसांनी आवश्यक कागदपत्रे समाजकल्याण विभागाला द्यावीत

आरटीओकडून प्रत्यक्ष रस्त्यावर कारवाई

आता आरटीओच्या वायुवेग पथकांकडून एचएसआरपी नसलेल्या वाहनांविरोधात प्रत्यक्ष तपासणी सुरू असून, जुन्या किंवा फॅन्सी नंबरप्लेट वापरणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आपली उर्वरित फिटमेंट प्रक्रिया पूर्ण करावी.

High Security Number Plate
Pune Municipal Engineers Election Duty: मतदार यादी पडताळणीसाठी अभियंते नियुक्त; पुण्यात विकासकामे ठप्प

वाहनांवर एचएसआरसीपी नंबरप्‍लेट बसवून घ्यावी

एचएसआरसीपी न बसविणाऱ्या वाहनमालकांचे वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे व उतरविणे आदी कामांवर निर्बंध लावण्यात आते होते. यापुढे अशा वाहनमालकांच्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण आदी सर्व कामे थांबविण्यात येणार आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. वाहन मालक-चालकांनी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरसीपी क्रमांकाची पट्टी बसवण्याबाबत कार्यवाही करावी.

High Security Number Plate
TET Exam: पेपरफुटीनंतर टीईटी परीक्षा आता सप्टेंबरमध्ये? ऑनलाइन परीक्षेचाही पर्याय चर्चेत

वाहनांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एचएसआरपी अनिवार्य आहे. पुणेकरांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला असून आत्तापर्यंत ९.४५ लाखांहून अधिक वाहनांचे फिटमेंट पूर्ण झाले. परंतु, ज्यांनी अद्यापही ही नंबरप्लेट बसवलेली नाही, त्यांनी दंडात्मक कारवाईपूर्वी ती बसवून घ्यावी.

अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news