Pune Rain Alert: पुण्यात अतिवृष्टीचा अचूक अंदाज; खासगी कंपनीकडून तत्काळ माहिती

महापालिकेचा करार यशस्वी; 20 केंद्रांवरून जलद पावसाची आकडेवारी मिळणार
Rain
RainPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील अनेक भागांत गुरुवारी जी अतिवृष्टी झाली, त्याचा सर्वांत वेगवान अंदाज अन्‌‍ पावसाची आकडेवारी आशय मेजरमेंट या खासगी कंपनीने दिली आहे. महापालिका क्षेत्रात पडणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देण्यासाठी महापालिकेने शंतनू पेंढारकर यांच्या कंपनीशी हा करार केला आहे.

Rain
BATU University Affiliation: बाटू विद्यापीठाच्या संलग्नीकरणात मोठा बदल; महाविद्यालयांना मुभा

त्यानंतर पाऊस थांबताच पंधरा मिनिटांत वीस केंद्रांवरची एकूण पावसाची आकडेवारी वेगाने दिली. पुणे हवामान वेधशाळेची शहरात आठ केंद्र आहेत. मात्र, तेथील पावसाची आकडेवारी येण्यास वेळ लागतो. तसेच, शहरात पावसाचे जे हॉटस्पॉट आहेत अशा ठिकाणचा पावसाचा डेटा तत्काळ मिळण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

Rain
RTE Admission Lottery: आरटीई लॉटरीची तारीख जाहीर; 6 एप्रिलला होणार सोडत

शहरात कुठे किती पाऊस झाला? याचा अंदाज घेणे अवघड जात होते. त्यामुळे 2013 मध्ये महापालिकेने हा करार केला. तेव्हापासून अतिवृष्टीची माहिती ही कंपनी देत आहे. गुरुवारी शहरात झालेल्या अतिवृष्टीचा अलर्ट त्यांनी एक तास आधी दिला होता.

Rain
Land Registration Irregularities: जमीन नोंदणीतील अनियमिततेवर कारवाई; 47 अधिकाऱ्यांची चौकशी

याबाबत कंपनीचे संचालक शंतनू पेंढारकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हवामानबदल या विषयावर आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहोत. फळे, पालेभाज्या आणि पिके याबाबत माहिती देत असतो. शहराच्या पावसाचा डेटा आशय मेजरमेंट वेदर डिव्हिजनद्वारे दिला जातो.

Rain
Pune Illegal Overhead Cables: बेकायदा ओव्हरहेड केबल हटवण्याची मोहीम तीव्र

आमची 20 आटोमेटिक वेदर स्टेशन तो तत्काळ नोंदवतात. शहरात गुरुवारी 2 एप्रिल रोजी झालेला अतिवृष्टीचा डेटा देखील आम्ही दिला. यात सर्वाधिक पाऊस, वाऱ्याचा वेग, दिशा, हवेचा दाब कोणत्या भागात किती होता? याची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news