पुणे : सोसायटीतील फ्लॅट फोडून तब्बल सात लाखांचे दागिने पळवले

पुणे : सोसायटीतील फ्लॅट फोडून तब्बल सात लाखांचे दागिने पळवले

आळेफाटा (पुणे) ; पुढारी वृत्तसेवा : कामानिमित्त मूळगावी गेलेल्या एका व्यावसायिकाच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. आळेफाटा (जुन्नर) येथील रॉयल रेसिडेन्सी सोसायटीत हा प्रकार घडला. गुरुवारी (दि. १९ मे) सकाळी चोरीची घटना उघडकीस आली. याबाबत संतोष तुळशीराम शेलार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शेलार हे मुळ अकलापूर (ता. संगमनेर जि. अहमदनगर) येथील रहिवाशी असून, पत्नी व मुलीसोबत आळेफाटा येथील रॉयल रेसिडेन्सी सोसायटीत राहतात. १७ मे रोजी ते मूळगावी कुटूंबासोबत गेले होते.

दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप कापून आत प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटामधून २ लाख रुपये किमतीच्या पाच अंगठ्या, १ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन, दीड लाख रुपये किमतीचे कानातील डूल, अडीच लाख रुपये किमतीचे दोन नेकलेस असा एकूण सात रुपयांचा माल चोरून नेला. त्यांच्या सोसायटीच्या रहिवाश्यांनी शेलार यांचे फ्लॅटचे कुलूप तुटले असल्याचे पाहिले. त्यानंतर शेलार यांना घरात चोरी झाल्याचे कळवले. शेलार हे गुरुवारी आपल्या कुटुंबीयांसह घरी आले असता चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास चालू केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पुढील तपास करत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news