UCI Road World Championships 2032: पुण्यात रंगणार सायकलिंगचा महाकुंभ! रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपचे भारताला यजमानपद; २०३२ मध्ये होणार स्पर्धा

युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल’ (युसीआय) ने २०३२ च्या प्रतिष्ठित 'रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप' स्पर्धेचे यजमानपद पुण्याला जाहीर केले आहे.
Road World Championships
Road World Championships File Photo
Published on
Updated on

UCI Road World Championships 2032

पुणे: सायकलिंग जगतातून भारतासाठी एक अभिमानाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. ‘युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल’ (युसीआय) ने २०३२ च्या प्रतिष्ठित 'रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप' स्पर्धेचे यजमानपद भारताला जाहीर केले आहे. २०३२ मध्ये ही स्पर्धा पुण्यात होणार आहे. विशेष म्हणजे, भारतात पहिल्यांदाच या जागतिक पातळीवरील सायकल स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियनच्या (UCI) व्यवस्थापन समितीने भारतात सायकलिंगच्या सर्वात मोठ्या एकदिवसीय शर्यतींचे आयोजन करण्याच्या बाजूने मतदान केले. यजमानपदासाठी पुण्याच्या प्रस्तावासमोर नेदरलँड्समधील ग्रोनिंगन आणि ड्रेन्थे यांचे आव्हान होते. "इतिहासात पहिल्यांदाच आम्ही भारतात येत आहोत, जिथे १.४ अब्ज लोक राहतात," असे यूसीआयचे अध्यक्ष डेव्हिड लॅपार्टिएंट यांनी कॅनडातील मॉन्ट्रियल येथे नियामक मंडळाच्या वार्षिक अधिवेशनात जमलेल्या लोकांना सांगितले. "आम्हाला माहीत आहे की, आमच्या पुण्यातील मित्रांमध्ये या प्रांतात सायकलिंगची एक मजबूत संस्कृती आहे," असेही ते म्हणाले.

डेव्हिड लॅपार्टिएंट यांनी सांगितले की, दोन्ही यजमानपदासाठीचे प्रस्ताव अत्यंत भक्कम होते. त्यामुळे दोन्ही आयोजकांसाठी योग्य तोडगा काढत दोन वेगवेगळ्या स्पर्धांचे यजमानपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. २०३२ ची स्पर्धा पुण्याला, तर २०३४ ची रोड वर्ल्ड आणि पॅरा-सायकलिंग चॅम्पियनशिप अनुक्रमे ग्रोनिंगेन आणि ड्रेंथे येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Road World Championships
Baramati PM Modi Visit: बारामतीत २४ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींचा दौरा; AI संस्थेची पाहणी, प्रेरणास्थळाचे उद्घाटन

भारताने २०३२ च्या रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या यजमानपदासाठी उशिरा प्रस्ताव सादर केला होता. जानेवारीत महाराष्ट्रात झालेल्या बजाज पुणे ग्रँड टूर या भारतातील पहिल्या यूसीआय मान्यताप्राप्त स्टेज रेसनंतर भारताच्या जागतिक स्पर्धेच्या यजमानपदासाठीच्या प्रयत्नांना वेग आला. ही स्पर्धा १९ ते २३ जानेवारीदरम्यान पार पडली होती.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (CFI) सरचिटणीस मनिंदर पाल सिंह यांनी सांगितले की, रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठीचा प्रस्ताव उन्हाळ्याच्या सुरुवातीला आकाराला आला. विशेष म्हणजे, यूसीआयच्या प्रस्ताव सादर करण्याच्या ३१ डिसेंबरच्या नियमित मुदतीनंतर हा प्रस्ताव पुढे आला. तीन महिन्यांपूर्वी कुणाचाही यावर विश्वास बसला नसता की आपण युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप सारख्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करू शकू. परंतु, आता ही स्पर्धा इतिहासातील सर्वात भव्य स्पर्धा ठरेल," असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला आहे.

आशिया खंडातील मानाचे चौथे पर्व

रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपचा इतिहास पाहता, आतापर्यंत या स्पर्धेचे यजमानपद प्रामुख्याने पश्चिम युरोपातील देशांकडे राहिले आहे. १९७४ मध्ये कॅनडाने प्रथमच युरोपबाहेर या स्पर्धेचे आयोजन केले. त्यानंतर १९८६ मध्ये अमेरिकेतील कोलोरॅडो स्प्रिंग्स येथे स्पर्धा झाली. १९९० मध्ये जपानमधील उत्सुनोमिया येथे रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली. त्यानंतर आशिया खंडाला पुन्हा या स्पर्धेचे यजमानपद मिळण्यासाठी २०१६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. कतारमधील दोहा येथे २०१६ ची स्पर्धा झाली. २०२५ मध्ये रवांडाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करणारा पहिला आफ्रिकी देश होण्याचा मान मिळवला. संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबीला २०२८ च्या रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद आधीच देण्यात आले आहे. त्यामुळे २०३२ मध्ये पुण्यात होणारी स्पर्धा ही आशिया खंडातील चौथी रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप ठरणार आहे.

Road World Championships
Election Commission : निवडणूक आयोग स्वतंत्र असण्यासोबतच तसा दिसायलाही हवा : न्यायमूर्ती दीपांकर दत्ता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news