Ashadhi Wari Pune Palkhi Stay: पुणे विठ्ठलनामात दुमदुमले; पालखी मुक्कामामुळे शहरात भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा सोहळा

भजन-कीर्तनाचा गजर, मंदिरांत दर्शनासाठी गर्दी; सामाजिक संस्थांकडून वारकऱ्यांसाठी विविध सेवाभावी उपक्रम
Pandharpur Wari
Pandharpur WariPudhari
Published on
Updated on

पुणे: भजन-कीर्तनात तल्लीन झालेले वारकरी, विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी, सामाजिक संस्थांकडून राबविण्यात येणारे सेवाभावी उपक्रम अन्‌ सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टर्स, परिचारिका असे वातावरण शुक्रवारी (दि. १०) शहर आणि उपनगरात पाहायला मिळाले.

Pandharpur Wari
Pune Market Yard Ashadhi Wari: आषाढी वारीचा बाजारात उत्साह; दिंड्यांच्या खरेदीने मार्केट यार्डात ५ कोटींची उलाढाल

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी असल्याने भाविकांनीही श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाचे निमित्त साधले. टाळ-मृदंगांचा गजर, भजन-कीर्तनाने प्रसन्न झालेले वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह, पुणेकरांचे आदरातिथ्य आणि सेवाभावी संस्थांनी राबविलेले विविध उपक्रम, यामुळे पुण्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

Pandharpur Wari
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळी ५६ टक्क्यांवर; पावसाने उघडीप दिल्याने पाणीसाठ्याची वाढ मंदावली

पहाटे आरतीनंतर हरिपाठ, भजन आणि अभंग गायनाने दिवसाची सुरुवात झाली. जयघोषांनी श्री विठ्ठल मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. सकाळपासून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा मुक्काम असलेल्या भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या श्री निवडुंगा विठोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली, तर वारकऱ्यांचा मुक्काम असलेल्या विविध ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, गणेश मंडळे आणि स्थानिक नागरिकांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

Pandharpur Wari
Pune Palkhi Route Cleaning: पालखी मार्गाची रात्रभर स्वच्छता; पुणे महापालिकेने २७१ टन कचरा केला संकलित

दुपारच्या वेळेत अनेक वारकरी मुक्कामस्थळी दिंड्यांमध्ये भजन-कीर्तन सुरू होते. अनेकांनी श्री विठ्ठल मंदिरांसह ऐतिहासिक आणि धार्मिकस्थळांना भेट दिली. ठिकठिकाणी स्वागत कमानी, ध्वज आणि पताकांनी परिसर सजवण्यात आला होता. अनेक वारकरी आणि भाविकांनी सोशल मीडियावर पालखी मुक्कामातील क्षण, अभंग, कीर्तन आणि वारकऱ्यांच्या अनुभवांचे रील्स आणि छायाचित्रे शेअर केले.

Pandharpur Wari
Pune Wari VIP Darshan Controversy: वारीत ‘व्हीआयपी दर्शन’वरून वाद; तासन्‌तास रांगेत उभ्या वारकऱ्यांमध्ये नाराजी

त्यामुळे पुण्यातील भक्तिमय वातावरणाचा अनुभव देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहचला. सायंकाळीही ठिकठिकाणी सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. अनेक संस्थांनी वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती, तर दिवसभराचा थकवा विसरून वारकरी पुन्हा विठ्ठलनामात तल्लीन झाले. अनेक पुणेकरांनी सायंकाळी मुक्कामस्थळी भेट देत या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. पालखी मुक्कामामुळे शहरात भक्ती, समता, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news