Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळी ५६ टक्क्यांवर; पावसाने उघडीप दिल्याने पाणीसाठ्याची वाढ मंदावली

अतिवृष्टीनंतर चार दिवसांत जलसाठ्यात मोठी वाढ; पानशेत-वरसगाव परिसरात १० दिवसांनी सूर्यदर्शन
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on
Updated on

खडकवासला: खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोटक्षेत्रात शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने धरणांतील पाणीसाठ्यातील वाढ मंदावली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणसाखळीत १६.५२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ५६.६९ टक्के पाणीसाठा झाला होता. विशेष म्हणजे, पानशेत-वरसगाव परिसरात तब्बल १० दिवसांनंतर प्रथमच सूर्यदर्शन झाले.

Khadakwasla Dam
Pune Palkhi Route Cleaning: पालखी मार्गाची रात्रभर स्वच्छता; पुणे महापालिकेने २७१ टन कचरा केला संकलित

चार दिवसांच्या अतिवृष्टीनंतर पावसाचा जोर ओसरला असला, तरी नद्या, ओढे आणि नाल्यांमधून अजूनही पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक कायम आहे. गेल्या २४ तासांत धरणसाखळीत ०.३२ टीएमसी पाण्याची भर पडली. धरणसाखळीत गुरुवारी (दि. ९) सायंकाळी १६.१७ टीएमसी पाणीसाठा होता. खडकवासला धरणातून पाणी सोडले जात असले, तरी धरण पुन्हा १०० टक्के भरले आहे.

Khadakwasla Dam
Pune Wari VIP Darshan Controversy: वारीत ‘व्हीआयपी दर्शन’वरून वाद; तासन्‌तास रांगेत उभ्या वारकऱ्यांमध्ये नाराजी

मध्यम पाणीसाठ्याकडे धरणसाखळी

गेल्या १ जुलैपासून धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर ५ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. ३० जून रोजी केवळ ३.६३ टीएमसी इतका अल्प पाणीसाठा असलेली धरणसाखळी आता १६.५२ टीएमसीपर्यंत पोहोचली आहे. १ जून ते १० जुलैदरम्यान टेमघर धरणक्षेत्रात सर्वाधिक १,२२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, पानशेत येथे ९८५, वरसगाव येथे ९५५ आणि खडकवासला धरण क्षेत्रात ४१९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news