House Burglary: घरफोड्यांचा धुडगूस! पुण्यात उंड्री, सुखसागरनगरसह चार भागांत १८ लाखांचा ऐवज चोरीला

सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाईल फोनवर चोरट्यांची नजर; पोलिसांकडून तपास सुरू
House Burglary
House BurglaryPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुडगूस घातला असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये १८ लाख रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. उंड्री, कात्रजमधील सुखसागरनगर, फुरसुंगी, तसेच नवी पेठेतील लोकमान्यनगर भागात या घटना घडल्या.  (Latest Pune News)

House Burglary
Rain Forecast: राज्यात पुन्हा पावसाचा जोर! ७ नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

कात्रजमधील सुखसागरनगर भागात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ लाख ९८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे अंबामाता मंदिराजवळ असलेल्या गुरुदत्त व्हिला सोसयाटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाटातून दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

House Burglary
Two Year Old Memory Record: फक्त दोन वर्षांची चिमुरडी ठरली ‘रेकॉर्ड होल्डर’! मीराची अचाट स्मरणशक्ती पाहून सर्व थक्क

हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने असा ९७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक महेश नलावडे तपास करत आहेत. नवी पेठेतील लोकमान्यनगर भागात सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी ३६ हजारांचे चार मोबाईल संच लांबविल्याची घटना घडली. याबाबत पोलिस हवालदार भुजबळ तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news