

पुणेः पूर्वमध्य आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर पुन्हा नव्याने कमी दाबाचे क्षेत्र आहे तयार झाल्याने राज्यातील पावसाचा मुक्काम वाढला असून ७ नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. (Latest Pune News)
बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळ शमत नाही तोच पुन्हा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबरपर्यंत राज्यात हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे. कोकण आणि गोव्यात गत २४ तासांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस ( ७० ते २००मी.मी ) पाऊस नोंदला गेला आहे.
अशी आहे समुद्राची स्थिती...
पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा पूर्व-ईशान्येकडे सरकला.
तो काही तासांत उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यांकडे सरकण्याची शक्यता आहे.
पुढील २४ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात कमकुवत होण्याची शक्यता आहे.
दक्षिण म्यानमार किनारपट्टी आणि लगतच्या उत्तर अंदमान समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.
पुढील २४ तासांत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
२ नोव्हेंबर रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर एक नवीन पश्चिमी चक्रवात तयार होण्याची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान पावसाचा अंदाज आहे.