Pune Holi Tree Cutting: होळीसाठी वृक्षतोड केल्यास एक लाखांचा दंड; पुणे महापालिकेचा कडक इशारा

विनापरवाना झाडे तोडणे गुन्हा; पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे प्रशासनाचे आवाहन
Tree Cutting
Tree CuttingPudhari
Published on
Updated on

पुणे : शहरात होळीसाठी झाडांच्या फांद्या तोडण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी पुणे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. विनापरवाना झाडे तोडणे, जाळणे किंवा झाडांना कोणत्याही प्रकारे इजा करणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 2021 नुसार परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास संबंधित झाडाच्या मूल्याइतका दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड एक लाख रुपयांपर्यंत असू शकतो. त्यामुळे होळीच्या निमित्ताने वृक्षतोड करू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.

Tree Cutting
Kharadi Cyber Fraud: डिस्काउंट शेअर्सच्या आमिषाला बळी; खराडीत ज्येष्ठाची 1.49 कोटींची सायबर फसवणूक

शहरात काही ठिकाणी होळीसाठी झाडांच्या फांद्या कापणे किंवा झाडांची छाटणी करण्याचे प्रकार घडतात. मात्र, अशा कृतींमुळे पर्यावरणाची हानी होत असून, संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे महापालिकेने नमूद केले आहे. वृक्ष प्राधिकरणाकडून यासंदर्भात लक्ष ठेवले जाणार असून, तक्रार आल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे.

Tree Cutting
Dipali Doke Ward 11 Pune: प्रभाग ११ साठी दीपाली डोख यांचा निर्धार : कचरा, ड्रेनेज, मंडई व क्रीडांगणाचे प्रश्न लवकरच मार्गी

...येथे करा तक्रार

विनापरवाना वृक्षतोड किंवा झाडांना हानी होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारींसाठी 18001030222 हा टोल-फ्री क्रमांक, 9689900002 हा व्हॉट्‌‍सॲप क्रमांक तसेच ुुु. लेाश्रिरपळीं.र्ीिपशलेीेीिरींळेप.ेीस या संकेतस्थळाचा उपयोग करता येणार आहे.

Tree Cutting
MEA International Business Expo: पुण्यात ‘MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो’ला आजपासून सुरुवात; 550 हून अधिक उद्योजकांचा सहभाग

पर्यावरणपूरक पद्धतीने होळी सण साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि शहरातील झाडांचे संरक्षण करावे.

अशोक घोरपडे, उद्यान विभागप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news