Kharadi Cyber Fraud: डिस्काउंट शेअर्सच्या आमिषाला बळी; खराडीत ज्येष्ठाची 1.49 कोटींची सायबर फसवणूक

व्हॉट्सॲप ग्रुप, बनावट ॲप आणि आयपीओ अलॉटमेंटचा बहाणा; सिंहगड रोड व नांदेड सिटीतही लाखोंची लूट
Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

पुणे : डिस्काउंटमध्ये मिळणाऱ्या शेअर्सचा नाद खराडी येथील एका ज्येष्ठाला चांगलाच महागात पडला आहे. शेअर्स तर मिळाचे नाही मात्र, त्या नादात या ज्येष्ठांना तब्बल 1 कोटी 49 लाख 33 हजार रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

याप्रकरणी, 75 वर्षीय ज्येष्ठाने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cyber Fraud
Dipali Doke Ward 11 Pune: प्रभाग ११ साठी दीपाली डोख यांचा निर्धार : कचरा, ड्रेनेज, मंडई व क्रीडांगणाचे प्रश्न लवकरच मार्गी

सायबर चोरट्यांनी फिर्यादींसोबत संपर्क साधून त्यांना आपल्या व्हॉट्‌‍सॲप ग््रुापमध्ये ॲड करून घेतले. त्यानंतर त्यांना डिस्काउंटमध्ये (कमी किंमतीत) शेअर्स मिळतील तसेच आयपीओ देखील अलॉटमेंट होईल आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल असे प्रलोभन दाखविले. त्यालाच फिर्यादी बळी पडले. त्यांना जाळ्यात खेचण्यासाठी सायबर चोरट्यांनी एका ॲपवर शेअर्स आणि आयपीओमध्ये होणारा नफा दाखवून विश्वास संपादन केला.

Cyber Fraud
MEA International Business Expo: पुण्यात ‘MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो’ला आजपासून सुरुवात; 550 हून अधिक उद्योजकांचा सहभाग

त्यानंतर वेळोवेळी सायबर चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर फिर्यादीने 1 कोटी 49 लाख रुपये जमा केले. दरम्यान, काही दिवसानंतर फिर्यादींना आपण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत.

Cyber Fraud
Patas Daund Car Fire: पाटस येथे धावत्या चारचाकीला भीषण आग; वाहन जळून खाक, अर्धा तास वाहतूक ठप्प

सिंहगड रोडवरही 26.37 लाखांनी फसवणूक

अशाच प्रकारे सिंहगड रोड येथील एका व्यक्तीची देखील शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 26 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी, 52 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार सिंहगड रोड पोलिसांनी सायबर चोरट्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे, तर नांदेड सिटी परिसरातील 42 व्यक्तींनासुद्धा सायबर ठगांनी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने 8 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news