Pune Holi Celebration: पुण्यात उत्साहात होळी; सामाजिक उपक्रम, द्राक्षांचा महानैवेद्य आणि विशेष मुलांचा रंगोत्सव

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 2 हजार किलो द्राक्षांची आरास; 2,500 विशेष मुलांनी धूळवड साजरी केली
Holi Celebration
Holi CelebrationPudhari
Published on
Updated on

पुणे: उत्साही आणि आनंदी वातावरणात सोमवारी (दि. 2) होळीचा सण साजरा करण्यात आला. सायंकाळी शहर आणि उपनगरांत ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने होलिकादहन करण्यात आले, तर मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, प्रवचन, व्याख्यानांसह भक्तिगीतांचे कार्यक्रम आयोजित केले होते. काही संस्थांनी गरजू मुलांना पुरणपोळीचे वाटप केले, तर काही ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविले. भाविकांनी मंदिरांमध्ये दर्शन घेत आयुष्यात सुख-समृद्धी आणि मांगल्याची कामना केली.

Holi Celebration
Maharashtra Kesari 68th Competition: 68 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा: ‘महाराष्ट्रातून आणखी खाशाबा जाधव घडवायचे’ – मुरलीधर मोहोळ

गुलटेकडी येथील एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. इंदिरानगर येथील वसाहतीमध्ये कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांकडून पुरणपोळी गोळा करून त्या गरजू मुलांना वाटल्या. अन्न वाया जाऊ नये, यासाठी हा उपक्रम पुणे-सातारा रस्त्यावर राबविण्यात आला. पदपथावर राहणाऱ्या गरजू मुलांना पुरळपोळी वाटप करून सण साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेरला यांनी संयोजन केले. उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष होते. समृद्धी शेरला, लावण्या अरकल, ज्योती कांबळे, अलका जाधव, अश्विनी साठे, कोमल शिंदे, कोमल साळुंखे यांनी घरोघरी जाऊन पुरणपोळ्या गोळ्या केल्या. सुमारे 900 पुरणपोळ्यांचे वाटप करण्यात आले. संतोष डिंबळे, बाळासाहेब शेलार, रोहित कोंडाळ, नजीर शेख, जावेद शेख आदी उपस्थित होते.

Holi Celebration
Shirur Taluka Future MLA: शिरूर तालुक्यात ‘भावी आमदारां’ची चलती; स्थानिक निवडणुकांनंतर नवे राजकीय समीकरण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 2 हजार किलो द्राक्षांचा महानैवेद्य

काळी, हिरवी आणि लाल टपोऱ्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा आणि मंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उद्योजक विलास शिंदे उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.

होळी करा लहान, पोळी करा दान : अंनिसचा उपक्रम

सर्व सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे केले जावेत, यावर भर देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे ‌‘होळी करा लहान, पोळी करा दान‌’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शहराच्या विविध भागांत जाऊन कार्यकर्त्यांनी पुरणाची पोळी गोळा करून त्याचे गरजू व्यक्तींना वाटप केले. पुणे रेल्वेस्थानक परिसर, सिंहगड रस्ता, बिजलीनगर-चिंचवड येथे सुमारे 1500 पुरणपोळ्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात शीला परळीकर, रोहित एरंडे, अनुराधा काळे, मिलिंद देशमुख, श्रीपाल ललवाणी, अनिल वेल्हाळ, राहुल माने आदी कार्यकर्ते सहभागी झाले.

Holi Celebration
Maharashtra Rising Temperature: फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा; पुरंदर तालुक्यात तापमान वाढीचा आरोग्यावर परिणाम

जातीयवादाच्या भस्मासुराची होळी

वंदे मातरम्‌‍ संघटना संयुक्त युवा फिनिक्स सोसायटीच्या वतीने सण करू साजरे-माध्यम जरा वेगळे या संकल्पनेतून “जातीयवादाच्या भस्मासुराची होळी” तसेच जगभरात वाढलेल्या अत्याचाराच्या घटना, सत्तेचा गैरवापर आणि मानव तस्करीसारख्या कृतीच्या निषेधार्थ पोस्टर दहन करून होळी साजरी करण्यात आली. ही होळी गरवारे शाळेतील मुलींच्या हस्ते पेटवण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, शहराध्यक्ष अमोल जगताप, विशाल शिंदे, आकाश जामगे, राज घाटे, अतिश जाधव, तेजस्विनी शिंदे, निकिता कांबळे, फातिमा शेख उपस्थित होते. हा उपक्रम जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारकाच्या ठिकाणी आयोजित केला होता.

‌‘रंग बरसे भीगे चुनरवाली‌’, ‌’होली खेले रघुवीरा...,‌’ झिंगाट अन्‌‍ अशा विविध गीतांवर ठेका धरत, नैसर्गिक अन्‌‍ पर्यावरणपूरक रंगांची मुक्त उधळण करत आणि प्रत्येक क्षणाचा मनसोक्त आनंद घेत मंगळवारी (दि. 3) विशेष मुलांनी धूलिवंदनाचा म्हणजेच धूळवडचा आनंद लुटला आणि रंगोत्सवाच्या आनंदात तेही न्हाऊन गेले. निमित्त होते भोई प्रतिष्ठानतर्फे विशेष मुलांसाठी आयोजित केलेल्या ‌‘रंग बरसे‌’ महोत्सवाचे. या उपक्रमाचे यंदाचे 31 वे वर्ष होते.

Holi Celebration
Maharashtra Delivery Boy Police Verification: राज्यात डिलिव्हरी बॉयसाठी पोलिस पडताळणी बंधनकारक? सरकारचे स्पष्ट संकेत

हा महोत्सव रास्ता पेठेतील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केला होता. कोणी रस्त्यावर फुगे विकणारे, तर कोणी रेल्वेस्थानकावर बूट पॉलिश करणारे... कोणी देहविक्रय करणाऱ्या महिलांची मुले, तर कोणी एचआयव्हीसह जगणारी मुले... कोणी विशेष मुले, तर कोणी ऊसतोडणी कामगारांची मुले... आज सगळेजण एकत्र आले आणि सुमारे अडीच हजार मुलांनी सप्तरंगांची उधळण करीत रंगोत्सवाचा आनंद घेतला. मुलांचे पोलिस बॅण्ड पथकाच्या वादनाने स्वागत झाले, तर विविध गीतांवर थिरकत एकमेकांना पर्यावरणपूरक रंग लावत, सोबतीला नाष्टा आणि स्नेहभोजन, पाण्याचे फवारे यामध्ये नाचत मुलांनी धम्माल मजा केली. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ उद्योजक नरेश मित्तल, कोहिनूर ग््रुापचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्यासह विविध क्षेत्रांतील व्यक्तींनीही मुलांसह रंगांची उधळण करीत धूलिवंदनाचा आनंद लुटला. भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी संयोजन केले. नेक्स्ट जेन मूकबधिर मुलांची संस्था, ज्ञान गंगोत्री विशेष मुलांची संस्था, अस्तित्व गुरुकुल, समर्पण संस्था, बचपन वर्ल्ड फोरम, वंचित विकास, वाघमोडे प्रतिष्ठान, अलका फाउंडेशन अशा विविध संस्थांमधील मुले महोत्सवात सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news