Maharashtra Kesari 68th Competition: 68 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा: ‘महाराष्ट्रातून आणखी खाशाबा जाधव घडवायचे’ – मुरलीधर मोहोळ

पुण्यात वासापूजन समारंभात कुस्तीला देशपातळीवर वलय देण्याचा संकल्प; क्रीडानगरीला अजित पवार यांचे नाव देण्याची घोषणा
Maharashtra Kesari 68th Competition
Maharashtra Kesari 68th CompetitionPudhari
Published on
Updated on

पुणे / वाघोली: ‌‘महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती वाढली पाहिजे. आपली कुस्ती मोठी झाली पाहिजे, या कुस्तीमध्ये आम्हाला आणखी खाशाबा जाधव घडवायचे आहेत. हा आयोजनामागील प्रामाणिक उद्देश आहे. इतर खेळांच्या तुलनेत आपली कुस्ती मागे राहता कामा नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्हाला कुस्तीला देशपातळीवर वलय निर्माण करून द्यायचे आहे,‌’ असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

Maharashtra Kesari 68th Competition
Shirur Taluka Future MLA: शिरूर तालुक्यात ‘भावी आमदारां’ची चलती; स्थानिक निवडणुकांनंतर नवे राजकीय समीकरण

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे वासापूजन व मातीपूजन समारंभात ते बोलत होते. या वेळी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस संजय शेटे, आमदार बापू पठारे, संघाचे सरचिटणीस योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे मेघराज कटके यांसह अनेक महाराष्ट्र केसरी व मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra Kesari 68th Competition
Maharashtra Rising Temperature: फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा; पुरंदर तालुक्यात तापमान वाढीचा आरोग्यावर परिणाम

मोहोळ म्हणाले, ‌‘या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीपटूंनी मोठी कामगिरी करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावे या उद्दशाने स्व. मामासाहेब मोहोळ यांनी ही स्पर्धा सुरू केली. आमचे या लाल मातीसोबत जे नाते तयार झाले आहे, ते नाते कधीही तुटणार नाही. अनेक कुस्तीपटू चमकदार कामगिरी करत आहेत. त्याचबरोबर स्पर्धेच्या क्रीडानगरीला स्व. अजित पवार यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणाही या वेळी केली.सातव म्हणाले, स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील कुस्तीपटूंना पाठबळ मिळावे, कुस्तीला ताकद मिळावी, यासाठी आम्ही चांगल्या प्रकारची बक्षिसे देत आहोत. आपण सर्वजण मिळून आपल्या लाल मातीतल्या कुस्तीला मोठे करूया आणि या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू घडविण्यासाठी प्रयत्नशील राहुया.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news