Pune High Blood Pressure Screening: पुण्यात 75 हजार नागरिकांना उच्च रक्तदाब

महापालिकेच्या तपासणीत धक्कादायक आकडे; मधुमेहासह असंसर्गजन्य आजारांवर लक्ष
High Blood Pressure
High Blood PressurePudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेतर्फे शहरात राबवण्यात येत असलेल्या असंसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत गेल्या सात महिन्यांत तब्बल 75 हजारांहून अधिक नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचा (हायपरटेन्शन) त्रास आढळून आला आहे. शहरात 1 एप्रिल 2025 ते 13 फेबुवारी 2026 या कालावधीत महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही तपासणी करण्यात आली.

High Blood Pressure
Pune Education Officer Irregularities: पुणे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर अनियमिततेचे आरोप

शहरात 30 वर्षांवरील सुमारे 17 लाख 89 हजार 159 नागरिक आहेत. त्यापैकी महापालिकेच्या 19 शहरी आरोग्य केंद्रे, 45 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांअंतर्गत 8 लाख 36 हजार नागरिकांची उच्च रक्तदाबासाठी तपासणी करण्यात आली. त्यापैकी 75 हजार 148 नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे निदान झाले आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये नागरिकांची तपासणी होत असून, एनसीडी पोर्टलवर नोंद केली जात आहे. त्यामुळे तपासणी, निदान, उपचार व फॉलोअपची डिजिटल नोंद यासाठी कमी वेळ लागत आहे.

High Blood Pressure
Narayangaon Tamasha Season 2026: नारायणगावात तमाशा हंगामाला जोरदार सुरुवात

उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठीही नागरिकांची तपासणी सुरू आहे. तपासणीत संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील निदान व उपचारांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना नियमित तपासणी करून घेण्याचे, आहार आणि जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन केले आहे. वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास उच्च रक्तदाबासारखे असंसर्गजन्य आजार नियंत्रणात ठेवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

High Blood Pressure
PMRDA Structural Plan Issue: पीएमआरडीएच्या स्ट्रक्चरल प्लानवर निर्बंध; 20 टीपी योजना रखडल्या

मधुमेह रुग्णांची सद्य:स्थिती

  • कालावधी : 1 एप्रिल 2025 ते 13 फेबुवारी 2026

  • 30 वर्षांवरील लोकसंख्या : 17,89,159

  • मधुमेहासाठी तपासणी : 7,65,051 नागरिक

  • निदान झालेले रुग्ण : 44,101

High Blood Pressure
Pune Parvati Maratha History: पर्वतीवर मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास; बाजीराव पेशव्यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आकर्षण

बदलती जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव, चुकीच्या आहाराच्या सवयी यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः 30 वर्षांवरील वयोगटात हा आजार अधिक प्रमाणात आढळून येत असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news