Pune Health News : पुणेकरांच्या फुप्फुसाचे काय होणार?

Pune Health News : पुणेकरांच्या फुप्फुसाचे काय होणार?

पुणे : विकेंड सुरू होताच दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकरांनी गर्दी केली. लाखो वाहने बाहेर काढल्याने इंधनज्वलनातून बाहेर पडणार्‍या अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (शनिवारी) खूप जास्त वाढले होते. शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहन कोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांसह नागरिकांच्या फुप्फुसांचे काय होणार? असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. शहरात अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण तब्बल 13.6 पटीने वाढले होते. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी लोकांनी गर्दीपासून दूर राहावे.

शक्य असल्यास एन्फ्लुएन्झाची लस घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. बाजारपेठ विविध साहित्यांनी नटली आहे. त्यामुळे शुक्रवारपासूनच विकेंडची गर्दी बाजारात दिसत होती. शनिवारी तर गर्दीने उच्चांक गाठला.सुटी असल्याने सकाळपासूनच बाजारात सर्वत्र तुफान गर्दी दिसून येत होती.

शिवाजीनगर, स्वारगेट, शिवाजी रस्ता, कर्वे रस्ता, कात्रज, पाषाण रस्ता ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता, नगर रस्ता, उपनगरांतील सर्व भाग, शहरातील सर्व पेठा या भागांत मोठी वाहतूक कोंडी करून नागरिक दिवाळीची खरेदी करीत होते. खूप लोकांनी मास्क लावलेला नव्हता. त्यामुळे प्रत्येकाची फुप्फुसे ही प्रदूषित हवेने भरून गेली असणार, असा डॉक्टरांचा दावा आहे.

अतिसूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणात 13.6 पटीने वाढ

शुक्रवारी व शनिवारी शहरात वाहनांची प्रचंड कोंडी झाल्याने त्यातून बाहेर पडणारे सूक्ष्म धूलिकण (पी. ए. 10) व अतिसूक्ष्म धूलिकण (पी. एम. 2.5) यांचे प्रमाण खूप वाढले. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या प्रमाणापेक्षा पुणे शहरातील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण हे 13.6 पटींनी वाढले होते.

हवेची गुणवत्ता खूप खराब

शिवाजीनगर, स्वारगेट, शिवाजी रस्ता, विद्यापीठ रस्ता, कात्रज रस्ता या भागातील हवेची गुणवत्ता खालावली गेली होती. शहरात सर्वत्र वाहतूक कोंडीने नागरिकांसह वाहतूक पोलिसही हैराण झाले. काही पोलिस व नागरिकांच्या चेहर्‍यावर मास्क होता. मात्र, 99 टक्के लोकांनी मास्क घातलेले नव्हते. शहराच्या हवेची गुणवत्ता सरासरीपेक्षा तिप्पट जास्त आढळून आली. शहरात हवेची सरासरी गुणवत्ता शुक्रवारी व शनिवारी 157 ते 160 मायक्रो ग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतकी होती. यात पीएम 2.5 या अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे नागरिकांना वाहनकोंडीमुळे खूप त्रास झाला.

शुक्रवार व शनिवारच्या हवेची गुणवत्ता

(मायक्रो ग्रॅम प्रतिक्युबिक मीटर)

  • स्वारगेट : 245
  • शिवाजीनगर : 239
  • कात्रज रस्ता : 150
  • विद्यापीठ रस्ता :160
  • पाषाण रस्ता : 165
  • भूमकर चौक :170

डॉक्टर म्हणतात…

  •  लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींनी गर्दीत जाणे टाळावे
  •  गर्दीत जाताना प्रत्येकाने हिवाळा संपेपर्यंत मास्क वापरावा
  • ज्येष्ठांनी कोरोनाची तिसरी लस घेतली नसेल तर आवर्जून घ्यावी
  • शक्य असल्यास प्रत्येकाने एन्फ्लुएन्झाची लस घ्यावी म्हणजे आजारांपासून दूर राहता येईल.

डॉक्टर म्हणतात…

  • लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींनी गर्दीत जाणे टाळावे
  • गर्दीत जाताना प्रत्येकाने हिवाळा संपेपर्यंत मास्क वापरावा
  • ज्येष्ठांनी कोरोनाची तिसरी लस घेतली नसेल तर आवर्जून घ्यावी
  • शक्य असल्यास प्रत्येकाने एन्फ्लुएन्झाची लस घ्यावी म्हणजे आजारांपासून दूर राहता येईल.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news