Indapur Crime: इंदापूर नगरपरिषद कार्यालयाबाहेर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर हल्ला

चार अज्ञात हल्लेखोरांकडून चाकू आणि चॉपरने हल्ला; वसीम शेख जखमी, पोलिस तपास सुरू आहेत
Anil Pawar
Anil PawarPudhari
Published on
Updated on

इंदापूर: इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल पवार यांच्यावर दिवसाढवळ्या नगरपरिषद कार्यालयाबाहेर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

Anil Pawar
Maharashtra UDID Card Scheme: राज्यातील ४.९७ लाख दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदत; ६० हजारांकडे अद्याप यूडीआयडी कार्ड नाही

गुरुवारी नगरपरिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी अचानक धाव घेत चॉपर आणि चाकूने हा हल्ला केला. या हल्ल्यात अनिल पवार यांच्या डाव्या हातावर वार झाला असून, प्रसंगावधान राखल्यामुळे ते मोठ्या अनर्थातून बचावले.

Anil Pawar
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग; संमती कराराची मुदत १५ जुलैपर्यंत वाढवली

त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले वसीम शेख हेदेखील या घटनेत जखमी झाले आहेत. दोघांवरही इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा पोलीस तपास करत आहेत.

Anil Pawar
Pune HSRP Number Plate: पुण्यात 9.45 लाख वाहनांवर HSRP नंबरप्लेट; नियम मोडणाऱ्यांवर आरटीओची कारवाई सुरू

दरम्यान, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी विरोधी पक्षनेते अनिल पवार यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी पवार म्हणाले, "मी या हल्ल्यातून वाचलो असून, पोलीस प्रशासन संबंधित हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news