Pune Tipu Pathan Extortion Case: पिस्तुलाच्या धाकाने हॉटेलचालकाकडून खंडणी; टिपू पठाण टोळीवर गुन्हा

दरमहा ₹५ हजार उकळल्याचा आरोप; काळेपडळ पोलिसांकडून कारवाई सुरू
Gun
Gun Pudhari
Published on
Updated on

पुणे: पिस्तुलाच्या धाकाने हॉटेलचालकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गुंड टिपू पठाण टोळीवर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एक वर्षापासून तो या हॉटेलचालकाकडून दरमहा 5 हजार रुपयांची खंडणी उकळत होता.

Gun
Pune Incorporated Villages Property Tax: समाविष्ट गावांच्या मिळकतकरासाठी विशेष सभा

याप्रकरणी मोहंमदवाडी येथील 54 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण (रा. ख्वाजा मंझील, सय्यदनगर, हडपसर), तन्वीर शकील शेख (रा. सय्यदनगर, हडपसर), इरफान नासीर शेख (रा. हडपसर), अजित ऊर्फ अंट्या महंमद हुसेन शेख (रा. सय्यदनगर, हडपसर), सद्दाम सलीम पठाण (रा. सय्यदनगर, हडपसर) व इतर 3 ते 4 साथीदार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 1 जानेवारी 2024 ते 12 जानेवारी 2025 यादरम्यान घडला होता.

Gun
Pune Property Tax: सर्वसाधारण सभेत मिळकतकर वाढ प्रस्ताव रद्द

टिपू पठाण व त्याच्या टोळीवर जमीन बळकावून, ती भाड्याने देऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मोहंमदवाडी येथील गुलामअलीनगरमध्ये हॉटेल आहे. जानेवारी 2024 मध्ये त्यांच्या ओळखीचा तन्वीर शेख हा एकेदिवशी त्यांच्या हॉटेलमध्ये आला. ‌‘तुम्हारा धंदा अच्छा चल रहा है और इसका मुनाफा तुम्हे टिपू भाईको देना पडेगा, नही तो टिपूभाई तुम्हारा हॉटेल चलने नहीं देंगे‌’ अशी धमकी देऊन निघून गेला.

Gun
Pune Water Supply Issues: प्रभागातील पाणी व ड्रेनेज समस्या सभागृहात ठळक

त्यानंतर टिपू पठाणचे लोक भाईला खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी देऊन निघून जात होते. काही दिवसांनी सायंकाळी इमान अफझल शेख याच्यासोबत तन्वीर शकील शेख हॉटेलमध्ये आला. त्याने टिपू पठाणला फोन लावला. फिर्यादीकडे दिला. तेव्हा समोरून ‌‘मैं टिपूभाई बोल रहा हूँ, मैने पार्टनरशिप में मटण का दुकान खोला है, तुम्हारे हॉटेल के लिए मेरे आदमीसे ही तुमको मटन लेना पडेगा, अगर नहीं लिया तो तुमको 5 हजार रुपये मेरेको देना पडेंगे...” अशी खंडणीची मागणी केली.

Gun
Pune Water Supply Dispute: पुणे पाणीपुरवठ्यावरून महापालिका–जलसंपदा विभाग आमने-सामने; ₹932 कोटींच्या थकबाकीवर वाद

दुसऱ्या दिवशी 12 जानेवारी रोजी संध्याकाळी तन्वीर शेख हा हॉटेलवर येऊन टिपूभाईने ऑफिसमध्ये बोलावले असल्याचे सांगितले. त्यानंतर ते टिपू पठाणच्या ख्वाजा मंझील येथील ऑफिसमध्ये भेटण्यासाठी गेले. त्या ठिकाणी टिपू पठाण, तन्वीर शकील शेख, इरफान नासीर शेख, अजिम ऊर्फ अंट्या महमंद हुसेन शेख, सद्दाम सलीम पठाण व त्यांचे इतर 3 ते 4 जण बसले होते. त्यांना पाहून टिपू पठाणने टेबलाचे ड्राव्हरमधील पिस्टल काढून तो हातामध्ये घेऊन त्यांना म्हणाला, ‌‘तुमको सय्यदनगर मे हॉटेल चलाना नहीं क्या, मेरी बात नहीं मानी तो गोली से उडा दूँगा,‌’ असे म्हणून त्यांना धमकाविले. टिपू पठाणने त्यांची कॉलर पकडून दम दिला की, आमच्या गँगला दरमहा 5 हजार रुपये खंडणी स्वरूपात द्यावे लागतील. आमच्या गँगमधील तन्वीर शेख, अजिम शेख, सद्दाम पठाण यापैकी कोणीही खंडणी मागण्यास तुझ्याकडे आला की त्याचेकडेे 5 हजार रुपये देत जा, अशी धमकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news