pune hadapsar bomb news: हडपसरमधील रुग्णालयातील बॉम्ब निकामी; ईव्ही दुचाकीवरुन आला होता संशयित?

Pune Latest News: पुण्यातील हडपसर भागातील एका रुग्णालयाच्या आवारात बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली.
Hadapsar Bomb Like Object
Hadapsar Bomb Like ObjectPudhari
Published on
Updated on

pune hadapsar bomb news latest update

पुणे /हडपसर: हडपसर भागातील एका रुग्णालयाच्या आवारात गुरुवारी (दि.13) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. रात्री उशिरा बॉम्ब निकामी करण्यात यश आले असून पुणे पोलिस, दहशतवादविरोधी पथक,पुणे क्राईम ब्रँचचे पथक या घटनेचा संयुक्त तपास करत आहे.

Hadapsar Bomb Like Object
Maharashtra Online Property Valuation: मालमत्तांचे मूल्य निर्धारण आता ऑनलाईन; 24 तासांत मिळणार व्हॅल्युएशन

संबंधित रुग्णालय हडपसरच्या मध्यवर्ती परिसरात आहे. रुग्णालयाच्या बाथरूममध्ये एक व्यक्तीला बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्या व्यक्तीने ते बाहेर आणून ठेवले. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली होती.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ANI वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, रात्री आठच्या सुमारास आम्हाला एका रुग्णालयात बॉम्ब सापडल्याची माहिती मिळाली. यानंतर बॉम्ब शोधक नाशक पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेत बॉम्बला मोकळ्य जागेवर नेले आणि बॉम्ब निकामी केला.

Hadapsar Bomb Like Object
Maharashtra State Olympic Delay: राज्य ऑलिम्पिक स्पर्धा पुन्हा लांबणीवर; प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे खोळंबा

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचे बीडीडीएस पथक, अग्निशमन दलाचे पथक, हडपसर पोलिस तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पोहोचले होते. संबंधित वस्तू ताब्यात घेऊन पथकाने ती ग्लायडिंग सेंटर येथील मोकळ्या जागेत हलवली होती. त्यामध्ये जिलेटीन कांड्या होत्या.

पुणे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी आठ पथक केली तयार केली असून ज्याने वस्तू ठेवली तो एकटा आला होता आणखी कोण सोबत होत याचा तपास सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पुणे पोलिसांनी केल आहे.

बॉम्ब ठेवणारा आरोपी इलेक्ट्रिक दुचाकीतून हॉस्पिटलमध्ये आला होता. स्फोट होण्यासाठी आरोपीने टायमर बॉम्बचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीच्या आधारे घटनेचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news