Maharashtra Online Property Valuation: मालमत्तांचे मूल्य निर्धारण आता ऑनलाईन; 24 तासांत मिळणार व्हॅल्युएशन

महाराष्ट्रात मालमत्तांचे मूल्य निर्धारण करण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. सर्वे क्रमांक आणि क्षेत्रफळ टाकून नागरिकांना 24 तासांत डिजिटल स्वाक्षरीसह व्हॅल्युएशन मिळणार
Property
PropertyPudhari
Published on
Updated on

पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे आता मालमत्तांचे मूल्य निर्धारण करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली जाणार आहे. यामुळे नागरिकांना आता जमिनीचे किंवा घराचे मूल्यांकन करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत.

Property
Pune Digital Arrest Cyber Fraud: पुणेकरांना डिजिटल अरेस्टचा फटका; अडीच वर्षांत 116 कोटींची सायबर फसवणूक

काय होती जुनी पद्धत?

आतापर्यंत एखाद्या खरेदीदाराला जागा खरेदी करायची असल्यास त्या जागेचे कागदपत्रे आणि सर्वे क्रमांक घेऊन नोंदणी विभागात जावे लागत असे. तिथे प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन ‌‘ग््राास‌’ प्रणालीवर पैसे भरावे लागत. या पैशांची पावती संबंधित कार्यालयात जमा केल्यावर, अधिकारी त्याची पडताळणी करत आणि त्यानंतर त्या कागदपत्रांवर शिक्का मारून मूल्य निर्धारण केले जात असे. या प्रक्रियेसाठी किमान तीन ते चार दिवसांचा अवधी लागत होता आणि नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या.

Property
Maharashtra State Olympic Delay: राज्य ऑलिम्पिक स्पर्धा पुन्हा लांबणीवर; प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे खोळंबा

आता 24 तासांत मिळणार ‌‘व्हॅल्युएशन‌’

नवीन ऑनलाईन सुविधेमुळे आता घरबसल्या मालमत्तेचे मूल्य किती आहे, हे नागरिकांना कळणार आहे. यासाठी केवळ जागेचे क्षेत्रफळ आणि सर्वे क्रमांक पोर्टलवर टाकून ऑनलाईन शुल्क भरावे लागेल. शुल्क भरल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी संबंधित जागेचे व्हॅल्युएशन नागरिकांना प्राप्त होईल. विशेष म्हणजे, हे मूल्य निर्धारण दुय्यम निबंधकाच्या डिजिटल स्वाक्षरीत मिळणार असल्याने ते सर्व कायदेशीर कामांसाठी ग््रााह्य धरले जाणार आहे.

Property
Maharashtra CET Result Update: सीईटी निकाल लवकरच जाहीर होणार; उत्तरतालिकेत बदलानंतर प्रक्रिया अंतिम टप्प्यात

नागरिकांना होणारे फायदे

  • वेळेची बचत : 3-4 दिवसांचे काम आता एका दिवसात होईल.

  • पारदर्शकता : मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने भष्टाचाराला आळा बसेल.

  • घरबसल्या सुविधा : कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आणि रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही.

  • डिजिटल स्वाक्षरी : ऑनलाईन मिळणारे प्रमाणपत्र अधिकृत आणि सुरक्षित असेल.

  • येत्या महिनाभरात ही प्रणाली राज्यभर कार्यान्वित होणार असून, यामुळे राज्यातील लाखो मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Property
SSC HSC Supplementary Exam: दहावी-बारावी पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जूनमध्येच परीक्षा होणार

ही प्रक्रिया सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात ही सुविधा संपूर्ण राज्यभरात लागू करण्याचा आमचा निर्धार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि पारदर्शकता वाढेल.

अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news