Pune Groundwater Crisis: पुण्यात भूजल संकट तीव्र; वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी चिंताजनक

शहराच्या परिघातील अनेक भागांत भूजल पातळी क्रिटिकल; टँकरवर अवलंबित्व वाढण्याची शक्यता
Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on

आशिष देशमुख

पुणे: शहराची लोकसंख्या सुमारे 60 लाखांच्या जवळ गेली आहे, तर पिंपरी-चिंचवडची 25 ते 28 लाखांवर गेली आहे. वाढती बांधकामे, लोकवस्ती आणि घरगुतीसह इतर क्षेत्रांसाठी वाढती पाण्याची गरज यामुळे बोअरवेलची संख्याही वाढली आहे. परिणामी भूजलाचा बेसुमार उपास वाढल्याने शहराच्या परिघावरील वाघोली, खराडी, बालेवाडी, हडपसर, कात्रजसह विविध भागांतील भूगर्भातील पाणीपातळीची घट गंभीर गटात (क्रिटिकल लेव्हल) पोहोचली आहे.

Water Supply
Female Foeticide Prevention: स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग

भूजल उपशाची स्थिती शहरातील बहुतांश भाग काहीशी अशीच असल्याने इतर भागातीलही भूजलपातळीतील घट गंभीरतेच्या दिशेने ( सेमी क्रिटिकल ) वाटचाल करीत आहे सन 2024ते 2026 मध्ये प्रकाशित झालेले विविध सरकारी अहवाल, शहर विकास योजना आणि पर्यावरण अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत, त्यातूनच पुणे महानगरातील विभागावार पाण्याची आणि भूजलाची वस्तुस्थिती समोर आलेली आहे.

Water Supply
Pune Rain Updates: पुण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; काही ठिकाणी गारपीट, पुढील काही तास महत्त्वाचे

महत्त्वाची निरीक्षणे...

  • पुणे : भूजल 400 ते 500 फूट खोल गेले आहे. विहिरी कोरड्या पडत आहेत.

  • शहराची लोकसंख्या दरवर्षी सुमारे 7 टक्यांनी वाढत असल्यामुळे अतिरिक्त 100 एमएलडी पाण्याची मागणी वाढते आहे.

  • वाढती लोकसंख्या आणि बांधकामामुळे भूजलावर अवलंबित्व वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांत टँकर वापर वाढण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे

  • पुणे शहर पूर्व व पूर्व-दक्षिण भागात भूजल ताण सर्वाधिक

  • पिंपरी-चिंचवड: औद्योगिक पट्‌‍ट्यात पाणी मागणी जास्त, प्रदूषण ही जास्त

  • पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत सुमारे 5 हजार बोअरवेल नोंदवले गेले असून, त्याचे जीआयएस सर्वेक्षण सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news