Pune Rain Updates: पुण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; काही ठिकाणी गारपीट, पुढील काही तास महत्त्वाचे

Pune Rain Updates: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
Pune Rain Updates
Pune Rain UpdatesPudhari
Published on
Updated on

Pune Rain Updates: महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आज अचानक हवामान बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुपारी २:५० वाजता देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या इशाऱ्यानुसार पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर आणि सांगली या पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. सध्या पुण्यात पाऊस सुरु आहे.

त्याचप्रमाणे मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि नांदेड येथेही विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांतही हवामान बिघडण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होऊ शकते.

Pune Rain Updates
Pune Student Safety: पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थिनींसोबत डिलिव्हरी बॉयकडून अश्लील वर्तन

या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात असून, गारपीट आणि जोरदार पावसामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच विजांच्या कडकडाटामुळे शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

शहरी भागांमध्येही या पावसाचा परिणाम दिसत आहे. अचानक पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच नियोजन करावे.

एकूणच, महाराष्ट्रात सध्या उन्हाळ्यात पावसाची स्थिती निर्माण झाली असून, पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news