

पुणे: श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर किराणा बाजारात उलाढाल वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच मार्केट यार्डातील घाऊक बाजारात साखरेच्या दरातील वाढीचा कल कायम आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत साखरेच्या दरात किलोमागे एक रुपयांनी वाढ झाली असून, गुळाचे भावही तेजीत आहेत.
अन्नधान्यामध्ये केवळ कोलम तांदळाच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यांचा समतोल कायम असल्याने खाद्यतेल, डाळी, बेसन, रवा, आटा, मैदा, साबुदाणा, भगर, नारळ तसेच इतर बहुतांश किराणा मालाचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. शहरात आठवडाभर झालेल्या पावसामुळे ग्राहकांची वर्दळ आणि खरेदी काहीशी मंदावली असली, तरी श्रावणातील वाढत्या मागणीमुळे येत्या आठवड्यात बाजारातील व्यवहारांना वेग येईल, असा अंदाज दि पूना मर्चंटसचे माजी सहसचिव विजय मुथा यांनी व्यक्त केला आहे.
बाजारभाव पुढीलप्रमाणे:
साखर (प्रतिक्विंटल) ४७५०-४८५० रु. खाद्यतेले (१५किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल २६५०-२९००, रिफाईंड तेल २४००-३२००, सरकी तेल २२५०-२७५०, सोयाबीन तेल २२००-२६००, पामतेल २२००-२५००, सूर्यफूल रिफाईंड तेल २३५०-२५५०, खोबरेल तेल ४०००, वनस्पती २२७०-२६०० रु. तांदूळ :- गुजरात उकडा ४३००-४६००, मसुरी ३५००-३७००, सोना मसूरी ५५००-५८००, एच.एम.टी. कोलम ६७००-७२००, लचकारी कोलम ७३००-७८००, चिन्नौर ७७००-८२००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००-११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु. गहू :- लोकवन नं. १ ४२५०-४६००, लोकवन नं. २ ३८००-४१००, नं.३ ३२५०-३८००, सिहोर नं. १ ५९००-६५००, सिहोरी ३८५०-४५५०, मिलबर ३०५०-३१५० रु.
ज्वारी:- गावरान नं. १ ५९००-६७००, गावरान नं.२ ५२००-५५००, नं.३ ४७००-५२००, दूरी नं.१ ३८००-४०००, दूरी नं. २ ३५००-३७०० रु बाजरी :- महिको नं.१ ३४००-३७००, महिको नं.२ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु. गूळ :- गूळ नं. १ ४९०० ते ५१००, गूळ नं.२ ४८२५ ते ४९००, गूळ नं.३ ४७०० ते ४८००, बॉक्स ५००० ते ६००० रु. डाळी :- तूरडाळ १००००-१२५००, हरभराडाळ ७५००-७७००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७४००-७५००, मटकीडाळ ९०००-९२००, उडीदडाळ १००००-१३००० रु. कडधान्ये :-हरभरा ७५००-७८००, हुलगा ६६००-७४००, चवळी ८३००-१०७००, मसूर ७५००-८२००, मूग ९३००-१२४००, मटकी गावरान १५५००-१७५००, मटकी पॉलिश ९०००-९५००, मटकी ८५००-१८८००, वाटाणा हिरवा ५२००-५६००, वाटाणा पांढरा ४८००-५२००, काबुली चणा ७९००-११४०० रु. साबुदाणा :-साबुदाणा नं. १ ७०००, साबुदाणा नं.२ ६५००, साबुदाणा नं.३ ६२०० रु. वरई भगर :-२००००-२१०००, सावा भगर १९०००-२०००० रु. गोटा खोबरे ३५०००-४०००० रु. शेंगदाणा :- जाडा ११३००-१२५००, स्पॅनिश–१३५००-१४५००, घुंगरू १२५००-१४०००रु.
नवीन आवक वाढल्याने शेंगदाणे स्वस्त
आंध्र प्रदेशात भुईमुगाचे नवीन पीक बाजारात येऊ लागल्याने तेथून शेंगदाण्याची आवक वाढली आहे. पुरवठा वाढल्याचा थेट परिणाम दरांवर झाला असून, मार्केट यार्डातील घाऊक बाजारात शेंगदाण्याच्या भावात किलोमागे ५ रुपयांची घट झाली आहे. पुढील काही दिवसांत नवीन मालाची आवक आणखी वाढल्यास दर स्थिर राहण्याची किंवा आणखी काहीशी नरमाई येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेंगदाणा व्यापारी अशोक लोढा यांनी ही माहिती दिली.