

पुणे: आषाढी एकादशी आणि द्वादशीमुळे शनिवारी आणि रविवारी मासळीची मागणी काहीशी मंदावली असली, तरी आठवडाभर नेहमीपेक्षा मागणी अधिक राहिल्याने मासळीचे वाढलेले दर कायम आहेत. मटण, चिकन आणि गावरान अंड्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, इंग्लिश अंड्यांची आवक वाढल्याने त्यांच्या भावात शेकड्यामागे ८० रुपयांची घट झाली आहे.
गुरूपौर्णिमेनंतर होणाऱ्या आखाड पार्ट्यांमुळे मासळीच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. २६) खोल समुद्रातील मासळी १० ते १२ टन, खाडीतील ४०० ते ५०० किलो आणि नदीच्या मासळीची ७०० ते ८०० इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे २० ते २५ टन इतकी आवक झाली होती.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):
पापलेट : कापरी : २०००-२२००, मोठे : १७००-१८००, मध्यम : १३००-१४००, लहान : ८००-९००, भिला : ७००-८००, हलवा : १०००-१२००, सुरमई १०००-१२००, रावस : ९००-१०००, घोळ : ९००-१०००, करली : ४००-५००, पाला (लहान) : ८००-९०० १०००-१४००, वाम : पिवळी १०००-१४००, काळी : ४००-६००, ओले बोंबील : ४००-५००.
कोळंबी : लहान : ३६०-४००, मध्यम : ४४०-६००, मोठी : ६५०-७५०, जम्बो प्रॉन्स : १२००-१४००, किंग प्रॉन्स : ९००-१०००, लॉबस्टर : १९००-२२००, मोरी : ४००-५५०, राणीमासा : ३५०-३४५०, खेकडे : ३५०-४५०, चिंबोर्या : ६००-७५०. खाडीची मासळी - सौंदाळे : ४५०-५००, नगली : ४००-४५०, तांबोशी : ५५०-६५०, पालू : २८०-३००, लेपा : ४००-४५०, बांगडा : ४००-५००, पेडवी : १६०-२००, बेळुंजी : १६०-२००, तिसर्या : २५०-३००, तारली : २५०-२५०.
नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कतला : १८०-२२०, मरळ : ३५०-४५०, शिवडा : २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : २५०-४००, चिलापी : ६०-१६०, वाम : ४००-४६०. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २४०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०. अंडी : गावरान (शेकडा) १२०० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ७००, डझन ९६, प्रतिनग ८.