Pune Grain Market Prices: गव्हाच्या तुटवड्याचा फटका; पुण्यात गहू, आटा-रवा-मैदा महागले

एफसीआयकडून विक्री बंद, तुरडाळ व उडीदडाळीचे दरही वाढले
Wheat
WheatPudhari
Published on
Updated on

पुणे: अन्न महामंडळाकडून गव्हाची विक्री न झाल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण होऊन हलक्या प्रतीच्या गव्हाच्या दरात क्विंटलमागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाली. यामुळे, लोकवान गहू तसेच आटा, रवा आणि मैद्याच्या दरातही पन्नास रुपयांनी वाढ झाली. तुरडाळ आणि उडीदडाळीचे दर आणखी शंभर रुपयांनी वाढले. मात्र आवक जावक साधारण असल्यामुळे साखर, खाद्यतेलांसह अन्य सर्व जिनसांचे दर स्थिर असल्याचे येथील घाऊक बाजारातून सांगण्यात आले.

Wheat
Pune Fruit Market Prices: संक्रांतीमुळे बोरांना मागणी; पुण्यात भावात १० ते २० टक्के वाढ

सध्या अन्न महामंडळाकडून गव्हाची विक्री बंद आहे. अन्न महामंडळाकडील गव्हाचा वापर प्रामुख्याने आटा, रवा आणि मैदा उत्पादनासाठी वापरला जातो. या गव्हाचा पुरवठा होत नसल्याने रोलर फ्लोअर मिलर्सकडून खुल्या बाजारात खरेदी सुरु झाली आहे. यामुळे मिलबर गव्हाच्या दरात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. यामुळे आट, रवा आणि मैद्याच्या दरात 50 किलोमागे 50 ते 75 रुपयांनी वाढ झाली. हंगामाचा शेवटचा काळ असल्याने गव्हाचे साठे कमी झाल्याने लोकवान गव्हाच्या दरातही क्विंटलमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली. मात्र आवक जावक साधारण असल्यामुळे ज्वारी आणि बाजरीचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

Wheat
Pune Vegetable Market Prices: थंडीचा फटका फळभाज्यांना; पुण्यात हिरवी मिरची, तोतापुरी कैरी महागली

तुरडाळ, उडीदडाळ दरात वाढ

आवक कमी असून मागणी चांगली असल्याने गेल्या आठवडयात तुरडाळीच्या दरात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. नव्या तुरीची अद्याप अपेक्षित प्रमाणात आवक होत नसल्याने दर वाढ झाल्याचे सांगण्यात आले. उडीदडाळीस मागणी चांगली असून आवक कमी आहे. यामुळे दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली. मात्र आवक जावक साधारण असल्यामुळे अन्य सर्व डाळी तसेच कडधान्यांचे दर स्थिर होते.

Wheat
Pune Fish Market Prices: गणेश पेठ मासळी बाजारात आवक घटली, मागणी वाढल्याने काही मासळी महागली

येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते:

साखर (प्रतिक्विंटल) 3950-4000 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2500-2600, रिफाईंड तेल 2110-2800, सरकी तेल 1920-2240, सोयाबीन तेल 1880-2300, पामतेल 1875-2075, सूर्यफूल रिफाईंड तेल 2150-2275, खोबरेल तेल 4500 वनस्पती 1820-2250 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 12500-14000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4050-4250, लोकवन नं. 2 3650-4050, नं.3 3350-3650, सिहोर नं. 1 5700- 6000, सिहोरी 3850-4450, मिलबर 3250-3300 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6200, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3200-3300 रु. गूळ :- गूळ एक्ष्ट्रा 4600-4750, गूळ नं. 1 4350-4550, गूळ नं.2 4000-4200 गूळ नं.3 3850-3950, नं. 4 - 3650-3800, बॉक्स 4000-5000, चिक्की गूळ 10/30 किलो 4500-4800, चिक्की गूळ एक, अर्धा व पाव किलो 5000-5800 रु. डाळी:- तूरडाळ 9000-11000, हरभराडाळ 6800-7000, मूगडाळ 9000-10000, मसूरडाळ 7400-7500, मटकीडाळ 8300-8400, उडीदडाळ 9000-10700 रु. कडधान्ये:-हरभरा 6200-6500, हुलगा 4500-5000 चवळी 7000-9500, मसूर 6600-6700, मूग 9000- 9500, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6800-7000, मटकी गुजरात 6800-7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 14500-15000, वाटाणा हिरवा 9000-10000, वाटाणा पांढरा 4400-4500, काबुली चणा 7500-11000 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 5000, साबुदाणा नं.2 4750, साबुदाणा नं.3 4500 रु. वरई भगर :-9500-10500, सावा भगर 9000-9500 रु गोटा खोबरे 3100-3400 रु. शेंगदाणा :- जाडा 9500-10000, स्पॅनिश10500-11000, घुंगरु 9500-10000 टीजे 9000-10000 रु. धने :- गावरान 9000-11000, इंदूर 13000-15000 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4600-4900,पेण 4600-4800, मध्यम पोहा 4600-4800, दगडी पोहा 4800-5100, पातळ पांहा 5200-5800, सुपर पोहा 5200-5800, भाजका पोहा 650-750, मका पोहा 5500-650, भाजके डाळे 3200-3800, मुरमुरा सुरती (9किलोस) 560, भडंग 850-1100, घोटी 540 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1650-1750, रवा 1750-1800, मैदा 1750-1800.

Wheat
Sharad Pawar Inspired Fellowship : 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'पासून ९ साहित्यिकांनी घेतली फारकत

चिक्की गुळास मागणी, साखर मंदीतच

संक्रातीचा सण जवळ आल्यामुळे गुळास सध्या भरपूर मागणी आहे. आवकही चांगली होत असल्यने गेल्या आठवड्यात सर्व प्रकारच्या गुळाचे दर स्थिर होते. संक्रातीच्या काळातच मागणी असणाऱ्या चिक्की गुळाची आवक मुबलक प्रमाणात होत असून मागणीही चांगली असल्याचे सांगण्यात आले. सध्या बाजारात साखरेचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत आहे. मात्र मागणी बेताचीच असल्याने गेल्या आठवडयात साखरेचे दर स्थिर होते. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3 हजार 950 ते 4 हजार रुपये होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news