

गेल्या चार वर्षांपासून ९ साहित्यिक या फेलोशिपच्या निवड प्रक्रियेसाठी आणि मार्गदर्शनासाठी काम करत होते. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून आपण 'मार्गदर्शक' पदावरून बाजूला होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
Sharad Pawar Inspired Fellowship
पुणे : शरद पवार एआय सेंटरच्या (AI Centre) उद्घाटन कार्यक्रमाला उद्योगपती गौतम अदानी यांना निमंत्रित केल्याच्या निषेधार्थ 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'मधून ९ साहित्यिकांनी फारकत घेतली आहे. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून आपण 'मार्गदर्शक' पदावरून बाजूला होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
शरद पवार एआय सेंटरच्या एका कार्यक्रमात गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती आणि त्यांना दिलेले आमंत्रण याला या साहित्यिकांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. अदानी समूहावर होत असलेले आरोप आणि सद्यस्थितीतील राजकीय-सामाजिक वातावरण पाहता, त्यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करणे आपल्याला मान्य नसल्याची भूमिका या साहित्यिकांनी घेतली आहे.
गेल्या चार वर्षांपासून हे ९ साहित्यिक या फेलोशिपच्या निवड प्रक्रियेसाठी आणि मार्गदर्शनासाठी काम करत होते. मात्र, आता त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून आपण 'मार्गदर्शक' पदावरून बाजूला होत असल्याचे स्पष्ट केले आहे.