Pune Grain Market Prices: लांबलेल्या पावसाचा धान्य बाजाराला फटका; ज्वारी, तूरडाळ-हरभरा डाळ महागली

कर्नाटकातून आवक घटल्याने मसुरी, कोलम तांदळाच्या दरात किलोमागे २ ते ३ रुपयांची वाढ; गुळाच्या दरात २ ते ३ रुपयांची घट
Pulses
Pulses Pudhari
Published on
Updated on

पुणे: लांबलेल्या पावसाचा परिणाम आता अन्नधान्यांच्या दरांवर जाणवू लागला आहे. उत्पादक भागातून आवक घटल्याने ज्वारीच्या भावात किलोमागे ५ रुपयांनी वाढ झाली आहे. कर्नाटकातून मसुरी आणि कोलम तांदळाची आवक होते. मात्र, तेथील पाणीटंचाईमुळे आवक घटल्याने या दोन्ही तांदळांच्या भावात किलोमागे २ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे. गहू, बाजरी तसेच मसुरी आणि कोलम वगळता अन्य तांदळाचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

Pulses
Chakan Market Yard Vegetable Prices: चाकण बाजारात तरकारी मालाची आवक वाढली; ५ कोटी १५ लाखांची उलाढाल

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हरभरा आणि तूरडाळीच्या भावात किलोमागे ५ रुपयांनी वाढ झाली असून, अन्य डाळींचे भाव स्थिर आहेत. बाजारात साखरेला मागणी कमी असल्याने तिचे भावही स्थिरावले आहेत. सण-व्रतांचा श्रावण महिना संपल्यानंतर तसेच गणेशोत्सवाची प्रमुख खरेदी पूर्ण झाल्याने गुळाची मागणी कमी झाली आहे.

Pulses
Pune Fish Market Prices: गणेशोत्सवात पापलेट, रावस महागले; दरात १० टक्के वाढ

परिणामी, गुळाच्या भावात किलोमागे २ ते ३ रुपयांनी घट झाली आहे. गोटा खोबऱ्याचे भावही किलोमागे १० रुपयांनी उतरले आहेत. नारळाला मागणी चांगली असली, तरी यापूर्वीच भाव उंचावल्याने सध्या दर स्थिर आहेत. दरम्यान, मागणी आणि पुरवठ्यात समतोल असल्याने खाद्यतेल, शेंगदाणा, रवा, आटा, मैदा, बेसन, साबुदाणा, भगर आणि लाल मिरचीचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Pulses
Navale Bridge Container Accident: नवले पुलाजवळ कंटेनरच्या धडकेत २२ वर्षीय कामगाराचा मृत्यू; सहा जण जखमी

साखर (प्रतिक्विंटल) ४६५०-४७५० रु.

खाद्यतेले (१५ किलो/लिटर) : शेंगदाणा तेल २७५०-३०००, रिफाईंड तेल २६३०-३३००, सरकी तेल २५००-२९५०, सोयाबीन तेल २३००-२६००, पामतेल २३००-२६००, सूर्यफूल रिफाईंड तेल २५००-२७५०, खोबरेल तेल ४२००, वनस्पती २३००-२६२५ रु.

तांदूळ : गुजरात उकडा ४३००-४८००, मसुरी ३५००-३७००, सोना मसूरी ५७००-६०००, एच.एम.टी. कोलम ६९००-७१००, लचकारी कोलम ७५००-८०००, चिन्नौर ७५००-७८००, ११२१-११५००-१२५००, आंबेमोहोर (सुवासिक) १४५००-१६५००, बासमती अखंड १२५००-१४५००, बासमती दुबार १००००-१०५००, बासमती तिबार १०५००-११०००, बासमती मोगरा ६०००-६५००, बासमती कणी ४५००-५०००, १५०९-१०००-११०००, इंद्रायणी ६००० रु.

गहू : लोकवन नं. १ ४२५०-४६००, लोकवन नं. २ ३८००-४१००, नं.३ ३२५०-३८००, सिहोर नं. १ ५९००-६७००, सिहोरी ३८५०-४५५०, मिलबर ३०५०-३१५० रु.

ज्वारी :गावरान नं. १ ६५००-७०००, गावरान नं.२ ६०००-६५००, नं.३ ५३००-५८००, दूरी नं.१ ४२००-४५००, दूरी नं. २ ३८००-४१०० रु

बाजरी: महिको नं.१ ३४००-३७००, महिको नं.२ ३१००-३३००, गावरान ३०००-३२००, हायब्रीड २८५०-३०००रु.

गूळ : गूळ नं. १ ५४०० ते ५६००, गूळ नं.२ ५१०० ते ५३००, गूळ नं.३ ४८०० ते ५०००, बॉक्स ४७०० ते ६५०० रु.

डाळी: तूरडाळ १००००-१३५००, हरभरा डाळ ८०००-८५००, मूगडाळ ९०००-१००००, मसूरडाळ ७६००-७८००, मटकीडाळ १०००-१०५००, उडीदडाळ १००००-१२५०० रु.

Pulses
Pune Mandai Metro Station: गणेशोत्सवात मंडई मेट्रो स्थानक बंद नाही; गर्दी नियंत्रणासाठी एकेरी प्रवासाची व्यवस्था

कडधान्ये: हरभरा ७८००-८२००, हुलगा ६६००-७६००, चवळी ८५००-१०७००, मसूर ७७००-८५००, मूग ९६००-१२५००, मटकी गावरान १५०००-१७०००, मटकी पॉलिश ९४००-९८००, मटकी गुजरात १६५००-१७५००, मटकी राजस्थान ८८००-९२००, मटकी सेलम १७५००-१८५००, वाटाणा हिरवा ५२००-५९००, वाटाणा पांढरा ५७००-६२००, काबुली चणा ८२००-११४०० रु.

साबुदाणा : साबुदाणा नं.१ ८०००, साबुदाणा नं.२ ७८००, साबुदाणा नं.३ ७५०० रु.

वरई भगर : २००००-२१५००, सावा भगर १९०००-२०००० रु.

गोटा खोबरे ३२०००-३७०० रु.

शेंगदाणा : जाडा ११०००-१२२००, स्पॅनिश १४०००-१५५००, घुंगरु १२५००-१३५००

धने : गावरान १२०००-१३०००, इंदूर १५०००-१७००० इंदुर सुपर २५०००-३०००० रु.

पोहे : मध्य प्रदेश ४६००-४९००,पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४६००-४८००, दगडी पोहा ४८००-५१००,

पातळ पोहा ५२००-५८००, सुपर पोहा ५२००-५८००, भाजका पोहा ६५०-७५०, मका पोहा ५५०-६५०, भाजके डाळे ३२००-३८००, मुरमुरा सुरती (९किलोस) ५६०, भडंग ८५०-११००, घोटी ५४० रु. रवा, मैदा, आटा- (५० किलोचा भाव) आटा १६५०-१७५०, रवा १७००-१८००, मैदा १७००-१८००,

बेसन : (५० किलोस) ४५००-५२५० रु.

मिरची : काश्मीरी ढब्बी ६००००-६५०००, ब्याडगी ३५०००-५००००, लवंगी तेजा २३०००-२५०००, गुंटूर २४०००-२६०००, खुडवा गुंटूर १२०००-१३०००, खुडवा ब्याडगी १६०००-१८००० रु.

नारळ : (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग २५००-२७००, मद्रास ४२००-४५००, पालकोल जुना २६५०-२८००, सापसोल ३२००-४८०० रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news