Pune Graduate Teacher Constituency Election: पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीची भाजपला ताकद; डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंसाठी महायुतीचा निर्धार

पुण्यातील समन्वय बैठकीत दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्णय; शहरासह पाचही जिल्ह्यांत प्रचाराला गती देण्याचे नियोजन
Pune Graduate Teacher Constituency Election
Pune Graduate Teacher Constituency ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती धर्म पाळून ‘पदवीधर’च्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव आणि शिक्षक मतदारसंघासाठीचे उमेदवार कौस्तुभ गावडे, या भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने उभा राहणार असल्याचा निर्धार महायुतीच्या समन्वय बैठकीत करण्यात आला.

Pune Graduate Teacher Constituency Election
Jadhavwadi Leopard Captured: आंबेगाव तालुक्यात जाधववाडीत नर बिबट्या जेरबंद; गार ओढा, सुंदरमळा परिसरात भीती कायम

राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शुक्रवारी झालेल्या या बैठकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच महापौर मंजूषा नागपुरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, महेश लांडगे, चेतन तुपे, शंकर मांडेकर, सुनील शेळके, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जि. प. अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पिंपरी-चिंचवडचे जिल्हाध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, रमेश थोरात, संभाजी कुंजीर, अतुल बेनके, कात्रज डेअरीचे अध्यक्ष अरुण चांभारे, जि. प. गटनेते श्रीमंत ढोले, महिला अध्यक्ष मोनिका हरकुडे, सभापती अमोल नलावडे, राजेश पांडे तसेच सर्व तालुका आणि शहराध्यक्ष, सहा विधानसभा मतदारसंघांचे अध्यक्ष, नगरसेवक, दोन्ही पक्षांतील आजी-माजी आमदार, संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune Graduate Teacher Constituency Election
MahaRERA Compensation Recovery: महारेराकडून घरखरेदीदारांना ३६९ कोटींची नुकसानभरपाई वसूल; पुण्यातील ग्राहकांना ६८.६३ कोटींचा दिलासा

या वेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, इतर निवडणुकीसारखा या निवडणुकीत आपल्याला वेळ कमी मिळाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असून, आता परस्परांच्या सहकार्याने पुढे जाण्याची गरज आहे. पदवीधर मतदारसंघासाठी असलेल्या भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्याकडे केवळ राजकीय वारसा नसून त्या उच्चशिक्षित आहेत. तसेच, राज्यभरात ४५० हून अधिक शाळा असलेल्या संस्थेचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तसेच, कौस्तुभ गावडे यांच्यासारखा तरुण आणि अभ्यासू उमेदवार महायुतीने दिला आहे, असे पाटील यांनी नमूद केले. निवडणुकीपूर्वी मानपान आणि नाराजीचे प्रसंग घडत असले, तरी ते बाजूला ठेवून सर्वांनी हातात हात घालून काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Pune Graduate Teacher Constituency Election
Sarasbaug Mahalakshmi Temple: सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरात महासरस्वतीला स्फटिक माळ, तर महाकालीला रुद्राक्ष माळ अर्पण

कृषिमंत्री भरणे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि महायुतीच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत समन्वयाने काम करतील. महायुतीच्या प्रचारात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मागे राहणार नाहीत, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहर, तालुका, ग्रामीण भागापासून पाचही जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी राहतील.

Pune Graduate Teacher Constituency Election
Pune Water Cut: पुण्यात १० टक्के पाणीकपात सुरू; खडकवासला धरणसाखळीतील साठा ८७.३४ टक्क्यांवर

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण आणि त्यांना दिलेला शब्द पाळणे, या भावनेतून महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न केले जातील. दोन्ही उमेदवार निवडून आणणे, हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भूमिका भरणे यांनी मांडली. महायुतीच्या नेत्यांनी दर तीन ते चार महिन्यांनी अशा समन्वय बैठका घ्याव्यात तसेच तालुकास्तरावरही बैठका आयोजित करून कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. या वेळी दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी समन्वयाने काम करण्यासह तालुकास्तरावर बैठका घेऊन कार्यकर्त्यांपर्यंत समन्वयाची भूमिका पोहचवण्याचा प्रस्तावही भरणे यांनी मांडला. या प्रस्तावाला शहराध्यक्ष टिंगरे यांनी अनुमोदन देऊन पक्षाकडून भाजपच्या उमेदवारासाठी मैदानात उतरले जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी अनेक राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून विजयासाठी महायुती धर्म पाळला जाईल, असे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news