Pune Water Cut: पुण्यात १० टक्के पाणीकपात सुरू; खडकवासला धरणसाखळीतील साठा ८७.३४ टक्क्यांवर

गतवर्षीच्या तुलनेत साडेतीन टीएमसी पाण्याची तूट; ऑगस्टपर्यंत पुरवठ्याचे नियोजन, महापालिकेकडून पाणी बचतीला सुरुवात
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on: 
Updated on: 

खडकवासला: यंदा पावसाळा दीड महिना आधीच संपल्याने खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्याकडे पुणे शहर आणि जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याने राज्य सरकारच्या सूचनेनुसार पुण्यात पाणी बचतीची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

Khadakwasla Dam
Munitions India Limited CBI Case: पुण्यात संरक्षण कंपनीच्या अधिकाऱ्याविरुद्ध सीबीआयचा गुन्हा; ५०० कोटींच्या दारूगोळा कंत्राटात लाचखोरीचा संशय

शहराला बंदिस्त जलवाहिन्यांद्वारे दररोज ६१० क्युसेक पाणी घेणाऱ्या महापालिकेने गुरुवार (दि. १५) आणि शुक्रवार (दि. १६) या दोन दिवसांत ४४७ क्युसेक पाणी घेतले. गतवर्षी १६ ऑक्टोबर रोजी धरणसाखळीत २९.०६ टीएमसी म्हणजेच ९९.७० टक्के पाणीसाठा होता. यंदा शुक्रवारी (दि. १६) हा साठा २५.६६ टीएमसी म्हणजेच ८७.३४ टक्क्यांवर आला आहे.

Khadakwasla Dam
Pune Dengue Cases: पुण्यात डेंग्यूचा उद्रेक कायम; चार महिन्यांत १,६४३ रुग्ण, महापालिकेची अधिकाऱ्यांना नोटीस

त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे साडेतीन टीएमसी पाण्याची तूट आहे. खडकवासला धरणाचे शाखा अभियंता वीरेश राऊत म्हणाले की, महापालिकेने दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवार आणि शुक्रवारी नेहमीपेक्षा कमी पाणी घेण्यात आले. यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होईल.

Khadakwasla Dam
Pune Drinking Water Safety: पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; महापौरांना वॉटर प्युरिफायर भेट देत राष्ट्रवादीचे आंदोलन

शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. अल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर सरकारने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Khadakwasla Dam
Pune Property Tax Correction: पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; खासगी जागेचा ताबा घेतल्यानंतर १५ दिवसांत मिळकतकरात होणार दुरुस्ती

खडकवासला धरणातून शहर आणि जिल्ह्याला पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. त्यासाठी पानशेत आणि वरसगाव धरणांतून प्रत्येकी ६०० क्युसेक पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. दरम्यान, धरणसाखळीतील पाणीसाठ्यात घट सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news