Maharashtra Farmer Loan Waiver Scheme: शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांना लाभ

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेंतर्गत आतापर्यंत २४.६७ लाख लाभार्थी; कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे सहकार आयुक्तांचे आवाहन
Farmers loan waiver
Farmers Loan Waiver Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत सोमवारी (दि.१२) ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरमधील आठ जिल्ह्यांतील सुमारे २ लाख ६ हजार ४५० लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे. तरी संबंधितांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी केले आहे.

Farmers loan waiver
Ghod Dam Farmers Protest: शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित; संतप्त शेतकऱ्यांचा रांजणगाव एमआयडीसीला पाणी रोखण्याचा इशारा

तरी लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास सोसायट्या व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येत असून, संबंधित क्षेत्रीय स्तरावर कर्जमुक्तीच्या यादीबाबत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने दिनांक २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयांन्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ही योजना सुरू केली आहे.

Farmers loan waiver
Maharashtra Sahitya Parishad Dispute: शंभराव्या साहित्य संमेलनाआधीच मसापमध्ये अंतर्गत वाद; सुनील महाजन यांना कारवाईची नोटीस

या योजनेअंतर्गत दि. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या व दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या व दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीककर्ज व पुनर्गठीत / फेर पुनर्गठीत कर्जास रुपये दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. प्रथम यादीत १६.९६ लाख, दुसऱ्या यादीत ४.२० लाख आणि तिसऱ्या यादीतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून, आजअखेर एकूण २४.६७ लाख लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिध्दी केलेली आहे.

Farmers loan waiver
Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्यात

सहकार आयुक्तालयाने दिलेल्या सूचना

  • ही यादी कर्जमुक्तीची आहे. या यादीतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.

  • या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम दि. ३१ मार्च २०२६ रोजीची आहे. दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी दि. ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे.

  • या यादीतील राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकेंसंदर्भात काही शेतकऱ्यांच्या दिनांक ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या हेअर कट धोरणानुसार ही सर्व कर्ज निरंक करण्यात येणार आहेत.

  • योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये मयत झालेल्या तसेच वयस्कर व बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे अनुषंगाने दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आलेली आहे.

  • आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

Farmers loan waiver
Caste Verification Certificate: आता घरबसल्या मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र, नवी प्रणाली काय, सुनावणीसाठीचे तीन पर्याय कोणते?

जिल्हानिहाय पात्र लाभार्थी शेतकरीसंख्या तिसरी यादी (दि.१२ ऑक्‍टोबर २०२६)

  • पुणे विभाग : कोल्हापूर १३४२, पुणे १७११८, सांगली ११९२, सातारा १२०५, सोलापूर ६४७१ एकूण ११,९२८.

  • नाशिक विभाग : अहिल्यानगर ४४१५, धुळे २९१९, जळगाव १७५६, नंदुरबार १३४३, नाशिक ३८१११ एकूण १४,२४४.

  • कोकण विभाग : पालघर २०६, रायगड १३३४, रत्नागिरी ५४८, सिंधुदुर्ग ३३६, ठाणे 332 एकूण २७५६.

  • छत्रपती संभाजीनगर : बीड ४७,८२७, छत्रपती संभाजीनगर १९,१४०, धाराशिव १३,७००, हिंगोली १७,४४३, जालना २१,८७३, लातूर ५,१४८, नांदेड ५१,७२५, परभणी २९,५९४. एकूण २,०६,४५०.

  • अमरावती विभागातील शेतकऱ्यांची संख्या ८५ हजार ७६, तर नागपुरातील संख्या ३० हजार ७३८ इतकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news