LPG Cylinder Delivery Delay: पुण्यात गॅस सिलिंडर वितरणास उशीर; 96 तासांचा दावा फोल

प्रत्यक्षात 7–8 दिवस प्रतीक्षा; ओटीपी व पुरवठा समस्यांमुळे ग्राहकांची गैरसोय वाढली
LPG Gas
LPG GasPudhari
Published on
Updated on

पुणे: नोंदणी केल्यानंतर अवघ्या 96 तासांत (चार दिवसांत) गॅस सिलिंडर घरपोच मिळेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी दिली असली, तरी तो मिळण्यासाठी अजूनही सात-आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

LPG Gas
Urea Shortage Farmers: राजगुरुनगरमध्ये युरिया टंचाई; शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा

नोंदणी केलेला सिलिंडर मिळण्यास सात-आठ दिवस लागतात, असे आज अनेक ग््रााहकांनी सांगितले. शहरातील वितरकांनीही याला दुजोरा दिला आहे. गॅस कंपन्यांनी गॅसचा पुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकली असून, मागणीच्या 75 ते 80 टक्के पुरवठा सुरू केला आहे, असे वानवडी परिसरातील इंडेन गॅसचे वितरक प्रवीण खंडाळकर यांनी सांगितले. या पुरवठ्यामुळे नोंदणीचा सर्व बॅकलॉग निकाली निघत नसला, तरी ग््रााहकांना घरपोच गॅस सिलिंडर देणे शक्य झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LPG Gas
Pune University Mess Issue: पुणे विद्यापीठात मेस संकट; गॅसटंचाईमुळे विद्यार्थ्यांचे हाल

वानवडी परिसरातील गॅस वितरण केंद्रात सध्या दररोज 350 ते 400 ग््रााहकांकडून मागणी नोंदविली जात असून, दररोज किमान 300 ते 325 ग््रााहकांना सिलिंडर पुरविण्याचा आमचा प्रयत्न असतो. पुरवठा पूर्वपदावर येत असल्याने शहरात गॅससाठी रांगा लागण्याचे प्रमाणही आता कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

LPG Gas
Pune Investment Fraud: पाण्याच्या प्लांट गुंतवणुकीत 2.34 कोटींची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा

सिलिंडरसाठी ओटीपी आवश्यक केल्याने ग््रााहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः वस्ती भागातील नागरिकांना सिलिंडर देणे त्यामुळे शक्य होत नाही. तसेच ओटीपी खेरीज गॅस सिलिंडर दिल्याचे निदर्शनास आल्यास कंपनीकडून सिस्टिम ब्लॉक केली जाते, त्यामुळे वितरकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, अशी व्यथा पौड फाट्यावरील एचपी गॅसचे वितरक व प्रताप गॅस एजन्सीचे संचालक नरेंद्र सपट यांनी व्यक्त केली. कंपन्यांकडून पुरवठा पूर्ववत करण्यास चांगले सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

LPG Gas
Pune Government Hospital: पुण्यात एमआरआय-सीटी स्कॅनची कमतरता; गरीब रुग्णांची परवड

मी ‌‘हॅलो बीपीसीएल‌’ या ॲप्लिकेशनवरून गॅस बुक केला. माझ्या मोबाईलवर आलेला ओटीपी गॅस एजन्सीमध्ये जाऊन दाखवला. त्यानंतर 4 दिवसांमध्ये सिलिंडर घरी येईल, असे सांगण्यात आले. चार दिवसांनी जाऊन चौकशी केल्यावर गॅस सिलिंडर घरपोच मिळणार नाही, असे उत्तर मिळाले. माझे वय 70 वर्षे असून, मी एकटा राहतो. रिकामा सिलिंडर घेऊन जाणे आणि दुसरा घेऊन येणे मला शक्य नाही. ज्येष्ठ नागरिकांची अडचण गॅस एजन्सीने समजून घ्यायला हवी.

चंद्रशेखर केळकर, ज्येष्ठ नागरिक

आमच्याकडे दोन सिलिंडर आहेत. पहिला सिलिंडर संपल्याने 4 मार्चला नोंदणी करण्यासाठी फोन केला. तेव्हा त्यांनी सांगितले की, तुमचे बुकिंग 31 मार्चनंतर ओपन होईल. त्यानंतरच फोन करून नोंदणी करा.

आरती देशमुख, धनकवडी

जिल्हाधिक गॅस सिलिंडरची नोंद केल्यानंतर तो 96 तासांत मिळेल, असे जाहीर केले. मात्र, सिलिंडरची नोंद 25 दिवसांनंतर केली. त्यास सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी उलटला. तरीदेखील सिलिंडर गॅस मिळणे मुश्किल झाले आहे.

संतोषी शिंदे गृहिणी, मुंढवा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news