Katraj Dairy President Resignation: कात्रज डेअरीत राजीनामा नाट्य; अखेर अध्यक्ष स्वप्निल ढमढेरे यांचा पदत्याग

संचालक मंडळातील वाद मंत्रालयापर्यंत; पक्षाच्या आदेशानंतर रात्री पार्थ पवारांकडे दिला राजीनामा
Katraj Dairy President Resignation
Katraj Dairy President ResignationPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे यांनी अखेर सोमवारी (दि. 25) रात्री आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे नेते खा. पार्थ पवार यांच्याकडे दिला. संघाच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या नावाने हा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी सकाळी संचालक मंडळाच्या बैठकीची सुरुवातच अध्यक्षांचा राजीनामा देण्यावरून झाली.

Katraj Dairy President Resignation
Pune Vistadome Coach: व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पुणे विभागाला 6.93 कोटींचा महसूल

मात्र, ढमढेरे यांनी ‌‘मला पक्षाचा, वरिष्ठाचा थेट कोणताच आदेश नसल्याने राजीनामा दिला नसल्याचे सांगताच बहुसंख्य संचालक सभागृहाबाहेर पडले, कोरम पूर्ण न झाल्याने सभाही तहकूब करण्यात आली आणि राजीनाम्याचे रंगलेले नाराजीनाट्य आणि वादावादी मंत्रालयस्तरापर्यंत पोहोचली.

कात्रज दूध संघावर राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाची एक हाती सत्ता आहे. दर वर्षी एका तालुक्यातील संचालकाला अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी संधी द्यावी, असा निर्णय झाला आणि त्यानुसार त्याची आत्तापर्यंत अंमलबजावणी झाली होती. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याबाबत इच्छुकांकडून सतत मागणी करण्यात येत होती.

Katraj Dairy President Resignation
Pune Nature Photography Exhibition: पुण्यात ‘प्रतिबिंब’ छायाचित्र प्रदर्शन सुरू; निसर्गाचे मनमोहक क्षण रसिकांसाठी खुले

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गेल्या आठवड्यात कात्रज दूध संघाच्या संचालकांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. याच वेळी पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय उपस्थित झाला. त्यानंतर आज होणाऱ्या बैठकीमध्ये पक्षाकडून निरोप दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार पक्ष प्रतिनिधी म्हणून पक्षाच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांनी तसा निरोप दिल्याचे सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितल्याशिवाय राजीनामा देणार नाही, अशी भूमिका ढमढेरे यांनी घेतली. त्या वेळी दहाहून अधिक संचालकांनी आक्रमक भूमिका घेतली.

Katraj Dairy President Resignation
Pune Gavran Mango: गावरान आंब्याला हवामानाचा फटका; उत्पादन 30% घट, दरात वाढ

संचालक मंडळाच्या बैठकीत खेडचे संचालक अरुण चांभारे यांनी हा मुद्दा उपस्थित केला व अन्य संचालकही आक्रमक झाले. अनेक संचालक सह्या न करता बैठकीबाहेर आले. हे सर्व सुरू असताना पक्ष निरीक्षक वैशाली नागवडे यांनी फोनवरून राजीनामाच्या पक्षाच्या निर्णयासंदर्भात कळवले. दरम्यान, संघाचे उपाध्यक्ष मारुती जगताप म्हणाले, “मला कोणताही निरोप राजीनामा देण्यासाठी आला नाही, त्यामुळे मी राजीनामा दिलेला नाही,” असे ‌‘पुढारी‌’शी बोलताना सांगितले.

Katraj Dairy President Resignation
Pune Knowledge Economy: पुणे बनणार नॉलेज इकोनॉमीचे राष्ट्रीय केंद्र; आयटी व उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा

माझ्या कार्यकाळात संघाचे हित, दूध उत्पादक शेतकरी, ग््रााहक आणि कात्रज बँडच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. संघाच्या कामकाजात सुधारणा, खर्च नियंत्रण, विक्रीवाढ, दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय, तसेच संस्थेच्या भविष्यातील विकासासाठी माझ्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून तसेच संघाच्या कामकाजात कोणताही प्रशासकीय अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने मी स्वेच्छेने अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. हा राजीनामा मी पक्षाचे खासदार पार्थ पवार यांच्याकडे रात्री दिला आहे, तसेच हा राजीनामा फक्त अध्यक्षपदाचा असून, संचालक पदाचा राजीनामा नाही.

ॲड. स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे, अध्यक्ष, कात्रज दूध संघ, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news