Pune Ganeshotsav Traffic Changes: गणेशमूर्ती खरेदीसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; हे रस्ते राहणार बंद!

डेंगळे पूल, छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग, केशवनगर परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने; पीएमपी बसमार्गातही बदल
Pune Road Diversion
Pune Road DiversionPudhari
Published on
Updated on

पुणे: प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि गणेशमूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील वाहतूकव्यवस्थेत सोमवारी (दि. १४) बदल करण्यात आले आहेत. डेंगळे पूल, मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग आणि मुंढव्यातील केशवनगर परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती विक्रेत्यांचे स्टॉल असल्याने सोमवारी या भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

Pune Road Diversion
Pune Illegal Parking: रस्ता रुंद केला; पार्किंगने पुन्हा ‘कोंडी’ केली! मित्रमंडळ चौक-पर्वती मार्गाची दुरवस्था

या मार्गाचा वापर करावा

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते मंडईतील गोटीराम भैया चौक हा मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक आणि शाहीर अमर शेख चौक या मार्गांचा वापर करावा. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौकमार्गे कुंभारवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून संताजी घोरपडे पथमार्गे कुंभारवेसकडे जावे. सारसबाग परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ केंद्रापर्यंत वाहनांना पार्किंग मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा आणि नीलायम चित्रपटगृहाजवळील उपलब्ध पार्किंगचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

Pune Road Diversion
Pune Ganeshotsav: ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; पुणे शहर झाले गणेशमय!

मध्य भागातील रस्ते बंद

सोमवारी (दि. १४) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मध्य भागातील वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता, फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक आणि मंगला चित्रपटगृहासमोरील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंढव्यातील केशवनगर परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन सोमवारी या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

Pune Road Diversion
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरण साखळीत २८.९० टीएमसी पाणीसाठा; ९९.१२ टक्के पाणी शिल्लक!

पीएमपी बसमार्गातही बदल

शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना आणि टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जातील. महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बस जंगली महाराज रस्त्याने वळविण्यात येणार आहेत.

Pune Road Diversion
Pune Ganeshotsav Police Bandobast: गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; ७,५०० पोलिसांचा फौजफाटा सज्ज!

पार्किंग व्यवस्था

कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा

संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा

टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता

मंडई वाहनतळ

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news