Traditional Instruments Ganeshotsav: डीजेचा कर्णकर्कश आवाज यंदा थांबणार? पुण्यात गणेशोत्सवासाठी पारंपरिक वाद्यांना वाढती मागणी

ढोल-ताशा, चौघडा, नगारा, तुतारी, सनई, शंखनादाला पसंती; अनेक पथकांची दहा दिवसांसाठी आगाऊ बुकिंग
Ganeshotsav
GaneshotsavPudhari
Published on
Updated on

सुवर्णा चव्‍हाण

पुणे: ढोल-ताशांचा निनाद, सनईचे मंगल स्वर, चौघडा-नगाऱ्याचे वादन अन् शंखनादाने भक्तिमय होणारे वातावरण... यंदाच्या गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला पारंपरिक लोकवाद्यांचे वादन पर्याय ठरणार आहे.

Ganeshotsav
Pune Tree Pruning: पुण्यात साडेचार वर्षांत ४६ हजार ५१५ वृक्षांची छाटणी; नव्या लागवडीची कायद्यात तरतूदच नाही!

पुण्यातील काही गणेश मंडळांनी यंदा डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली असून, ढोल-ताशासह चौघडा, नगारा, तुतारी, सनई, शंखनाद, झांज, संबळ, हलगी, मृदंग, लेझीम, आदी वाद्यांच्या पथकांना मागणी होत आहे. अनेक पथकांची गणेशोत्सवातील दहाही दिवसांसाठी आगाऊ नोंदणी झाली असून, काही पथकांना पुण्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथूनही वादनासाठी मागणी आली आहे.

Ganeshotsav
New Mutha Canal Land: नव्या मुठा कालव्याच्या जागी मेट्रो, सहापदरी रस्ता अन् हरित पट्टा; पुण्याचा चेहरामोहरा बदलणार

गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवातील मिरवणुका आणि कार्यक्रमांमध्ये डीजे आणि मोठ्या साऊंड सिस्टीमचा वापर वाढला आहे. त्यामुळे लोकवाद्य पथकांना फारसी मागणी होत नव्हती. मात्र, डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, त्यावरून सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या आणि विरोधाच्या पार्श्वभूमीवर यंदा काही मंडळांचा कल पुन्हा पारंपरिक लोकवाद्यांकडे वाढताना दिसत आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या मिरवणुकीपासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोकवाद्य पथकांना आणि कलाकारांना वादनासाठी निमंत्रित केले जात आहे.

Ganeshotsav
Pune Railway Police Attack: रेल्वे पोलिसाचा गळा चिरला; गांजा ओढण्यास हटकले म्हणून तरुणांचा जीवघेणा हल्ला

विशेष म्हणजे पुण्याच्या ग्रामीण भागातील लेझीम, झांज आणि ढोल - ताशा पथकांनाही शहरात सादरीकरणासाठी बोलावण्यात येत आहे. केशव शंखनाद पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन म्हणाले, आमच्या पथकाला गणेश मंडळांकडून चांगली मागणी आहे. मानाच्या आणि प्रमुख श्रीगणेश मंडळांसह इतर मंडळांनीही आगाऊ नोंदणी केली आहे.पथकात ७०० ते ८०० शंखवादक असून, सहा ते ८६ वर्षे वयोगटातील वादक सहभागी होणार आहेत.

चौघडा, नगारावादनासाठी मंडळांकडून विचारणा

लोककलावंत सुरेश लोणकर म्हणाले, यंदा पारंपरिक लोकवाद्यांना निश्चितच मागणी वाढली आहे. विशेषतः चौघडा आणि नगारावादनासाठी गणेश मंडळांकडून विचारणा होत आहे. माझ्याकडे सध्या आठ ठिकाणी वादनाचे कार्यक्रम निश्चित झाले आहेत. त्यामध्ये पुण्यासह मुंबई आणि नाशिक येथील कार्यक्रमांचा समावेश आहे.

Ganeshotsav
Maharashtra Groundwater Law: भूजल उपशावर आता सरकारचा ‘कडक’ कायदा; अनियंत्रित उपसा आणि प्रदूषणाला बसणार आळा

ढोल-ताशा पथकांनाही वाढती मागणी

ढोल-ताशा पथकांची मागणीही यंदा लक्षणीयरीत्या वाढली आहे. एका पथकाला उत्सवाच्या दहा दिवसांत साधारणपणे पाच ते दहा वादनांचे कार्यक्रम मिळत आहेत. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला पर्याय म्हणून अनेक गणेश मंडळे पारंपरिक ढोल - ताशाकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे पथकांची मागणी यंदा निश्चितच वाढली आहे, असे ढोल - ताशा महासंघाचे शहराध्यक्ष अक्षय बलकवडे यांनी सांगितले.

यंदा पारंपरिक वाद्य पथकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्या पथकाचे आतापर्यंत तीन - चार ठिकाणचे कार्यक्रम बुक झाले आहेत. निगडी, एरंडवणे, कोरेगाव पार्क परिसरासह पुण्याबाहेरही वादनासाठी कार्यक्रम मिळाले आहेत. आमच्या पथकात ९० ते १०० वादक असून, ढोल-ताशासोबत स्वतंत्र झांज पथक आहे.

योगेश पढेर, जय भवानी तरुण मंडळ (सिंहगड पायथा).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news