Pune Ganeshotsav Sound System Rules: गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टिमचा वाद कायमचा मिटवा; वसंत मोरेंची सरकारकडे मागणी

सर्व उत्सव, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी समान नियमावली करा; नियम मोडणाऱ्यांवर समान आणि कठोर कारवाईची मागणी
Vasant More
Vasant MorePudhari
Published on
Updated on

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टिमवर निर्बंध लावण्यावरून दरवर्षी वाद निर्माण होतो. गणेशोत्सव तोंडावर आला की प्रशासनाकडून नियम आणि निर्बंधांची चर्चा सुरू होते. हा वाद कायमचा संपविण्यासाठी शासनाने साउंड सिस्टिमच्या वापराबाबत एकदाच स्पष्ट आणि कायमस्वरूपी नियमावली तयार करावी. त्यामध्ये सर्व घटकांना सामावून घेऊन निश्चित केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी.

Vasant More
Pune Metro Coaches: पुणे मेट्रोमध्ये वाढणार डबे? वाढत्या गर्दीमुळे महामेट्रोची तयारी; ६ डब्यांच्या ट्रेनचा पर्याय

विशेष म्हणजे, हे नियम केवळ गणेशोत्सवापुरते न ठेवता सर्व उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांना समान असावेत, अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहरप्रमुख वसंत मोरे यांनी मांडली. विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टिमवरील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मोरे म्हणाले, “दरवर्षी गणेशोत्सव आला की साउंड सिस्टिम किती असावी, त्यावर कोणते निर्बंध असावेत, यावरून वाद उफाळतो.

Vasant More
Pune DJ Controversy: बापट, तोल सांभाळा...

असे दरवर्षी होण्यापेक्षा शासनाने एकदाच सर्वांना विश्वासात घेऊन नियम निश्चित करावेत. पुणेकरांचा आवाज आणि त्यांच्या भावनांचाही निर्णय घेताना विचार झाला पाहिजे. शासनाचा जो निर्णय असेल, त्यानुसार उत्सव साजरा झाला पाहिजे.”

Vasant More
Shalarth ID Teachers: २० टक्के अनुदानित शाळांतील शिक्षकांना शालार्थ आयडी द्या; विलंब झाल्यास शिस्तभंगाची कारवाई

नियमावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे

शासनाने केवळ नियमावली जाहीर करून थांबू नये, तर तिची प्रत्यक्ष अंमलबजावणीही झाली पाहिजे, असे सांगत मोरे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. “नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत नसेल, तर नियम करून उपयोग काय? विरोधकांना लक्ष्य करणे आणि काहींकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

Vasant More
U-DISE Plus Student Data Update: यू-डायस प्लसवर विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यास वेग; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

साउंड सिस्टिमबाबत निर्बंध असतील तर ते सर्वांना समान असले पाहिजेत. गणेशोत्सवापुरते वेगळे निकष नकोत. एकदा नियम ठरवून त्यांची समान आणि कठोर अंमलबजावणी केली, तर दरवर्षी निर्माण होणाऱ्या वादाला कायमचा पूर्णविराम मिळेल,” असे मोरे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news