U-DISE Plus Student Data Update: यू-डायस प्लसवर विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यास वेग; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

ड्रॉपबॉक्समधील ११ लाख ४१ हजार ५२५ विद्यार्थ्यांची माहिती शाळांनी तपासून इम्पोर्ट करण्याच्या सूचना
U-DISE Plus Student Data
U-DISE Plus Student DataPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील शाळांमध्ये 'यू-डायस प्लस' प्रणालीवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. ड्रॉपबॉक्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शाळेच्या यू-डायस प्लस प्रणालीमध्ये इम्पोर्ट करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या आहेत. यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

U-DISE Plus Student Data
Institutional Quota Three Times Fee: संस्थास्तर कोट्यातील प्रवेशासाठी तीनपट शुल्क आकारणीला विरोध; निर्णय रद्द करण्याची युवासेनेची मागणी

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पत्र पाठवून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. १ सप्टेंबर २०२६ च्या अहवालानुसार सन २०२६-२७ मध्ये ११ लाख ४१ हजार ५२५ विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये उपलब्ध असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

U-DISE Plus Student Data
Maharashtra School Approval: शाळांच्या मान्यता प्रक्रियेला वेग; दर्जावाढ, नव्या तुकड्या-शाखांना मंजुरीचे अधिकार विकेंद्रित

सन २०२५-२६ आणि २०२६-२७ मध्ये नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीची तुलना केल्यानंतर पूर्व प्राथमिक, इयत्ता पहिली, दुसरी, पाचवी, आठवी आणि इयत्ता नववीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची नोंदणी करणे बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांची माहिती तपासून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यू-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

U-DISE Plus Student Data
Devendra Fadnavis: ‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस

अडचणी सुटल्या नाही तर राज्य कार्यालयाला कळवा

जिल्हा कार्यालयांमध्ये समग्र शिक्षाअंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे काम पाहणारे पर्यायी शिक्षण समन्वयक कार्यरत असून, त्यांच्या मदतीने ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांच्या माहितीची पडताळणी करून प्रवेश घेतलेल्या शाळांमध्ये इम्पोर्ट करण्याबाबत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, जिल्हा व तालुकास्तरावर अडचणी सोडवता आल्या नाही, तर राज्य कार्यालयास लेखी स्वरूपात कळवावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

U-DISE Plus Student Data
Pune DJ Ban: पुण्यात डीजेविरोधात लोकचळवळ उभारणार; विद्यानंद बापटांचा निर्धार

अचूक माहिती भरण्याचे आवाहन

यू-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती अंतिम झाल्यानंतर तिचा उपयोग आरटीई प्रवेश, इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश, माध्यान्ह भोजन योजना, पाठ्यपुस्तक, गणवेश आदी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी केला जाणार आहे. त्यामुळे शाळांनी प्रणालीमध्ये भरलेली विद्यार्थ्यांची माहिती वस्तुनिष्ठ, अचूक आणि अद्ययावत असणे अत्यावश्यक असल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news