Pune Ganeshotsav Tenders: पुणे गणेशोत्सवाच्या कामांतील ‘तुकडे’ थांबवले; चार स्वतंत्र निविदा रद्द, एकच निविदा काढण्याचे आदेश

आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष, स्वागत मंडप, बॅरिकेडिंगसाठी प्रत्येकी २१.१८ लाखांच्या निविदा; अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचा निर्णय
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीसाठी आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष, स्वागत मंडप आणि बॅरिकेडिंगच्या कामांसाठी एकाच प्रभागात तब्बल चार स्वतंत्र निविदा काढण्याचा प्रकार अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांच्या आदेशाने थांबविण्यात आला आहे. एकाच स्वरूपाचे आणि एकाच ठिकाणचे काम चार तुकड्यांत विभागून काढलेल्या या निविदा रद्द करून संपूर्ण कामासाठी एकच निविदा काढण्याचे आदेश नायर यांनी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहेत.

Pune Municipal Corporation
Pune Ganeshotsav Decorations: दीड दिवसांच्या विसर्जनानंतरच पुण्यात गणेश देखाव्यांना गर्दी; मध्यवस्तीत भक्तांचा जनसागर

चार स्वतंत्र निविदा काढल्या होत्या

झोन क्रमांक ५ अंतर्गत विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणुकीदरम्यान आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष, स्वागत मंडप आणि बॅरिकेडिंग उभारण्यासाठी प्रत्येकी सुमारे २१ लाख १८ हजार रुपयांच्या चार स्वतंत्र निविदा काढल्या होत्या. या कामांसाठी महापौर निधीतून प्रभाग क्रमांक २५ मधील चारही नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे 'लॉकिंग' करून देण्यात आले आहे.

Pune Municipal Corporation
Pune Mumbai Expressway Rockfall Protection: पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या ‘कनेक्टिंग लिंक’वरील रॉकफॉल प्रोटेक्शन नोव्हेंबरपर्यंत; ३० टक्के काम पूर्ण

मुख्य मिरवणूक मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या पश्‍चिमेकडील भाग प्रभाग क्रमांक २५ मध्ये येतो. त्यामुळे महापौर निधीतून उपलब्ध झालेल्या सुमारे एक कोटी रुपयांतून एकच निविदा काढणे शक्य असतानाही चार स्वतंत्र निविदा काढण्यात आल्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. २५ लाख रुपयांपर्यंतच्या निविदांना प्रभाग समितीला मंजुरीचे अधिकार असल्याने कामाचे चार भाग करण्यात आल्याने संशयाला आणखी बळ मिळाले. मिरवणूक मार्गावर महापालिकेची कार्यालये, दवाखाने तसेच जुन्या शिक्षण संस्थांच्या इमारती आहेत.

Pune Municipal Corporation
Maharashtra Land Bank: सरकारी जमीन आता एका क्लिकवर; महसूल विभागाची ‘महाराष्ट्र लँड बँक’ प्रणाली सुरू

आरोग्य विभागाच्या १५ सुसज्ज रुग्णवाहिका आणि तीन आयसीयू बेडची सुविधाही उपलब्ध आहे. हिरकणी कक्षासाठी महापालिका कार्यालये, शाळा किंवा महाविद्यालयांच्या वर्गखोल्यांचा वापर करता येणे शक्य असल्याने या निविदांच्या आवश्यकतेवरही प्रश्न उपस्थित झाले होते. याबाबत नायर यांनी एकाच प्रभागात एकसारख्या कामासाठी चार निविदा काढणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. या चारही निविदा रद्द करून तातडीने एकच निविदा काढण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

Pune Municipal Corporation
Amravati Agriculture Officers: कृषी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर आयुक्तांचा दणका; अमरावतीतील अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव मागविला

निधीच्या 'तुकड्यां'मागे नेमके काय?

झोन क्रमांक ५ मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान यापूर्वी खासगी संस्थांच्या मदतीने स्वागत कक्ष आणि पोलिस कक्ष उभारण्यात येत होते. असे असतानाही याच कामांसाठी महापौर निधीतून चार नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख रुपये उपलब्ध करून देऊन चार स्वतंत्र निविदा काढण्याच्या उद्देशाबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news