Pune Ganesh Idol Prices: होर्मुझच्या अस्थिरतेचा बाप्पाच्या रंगांवर परिणाम; गणेशमूर्ती २० ते ३० टक्क्यांनी महाग

रंगांच्या दरात किलोमागे ४५० रुपयांपर्यंत वाढ; पीओपी, थिनर, ब्रश, वाहतूक आणि मजुरीही महागल्याने मूर्तिकारांचे गणित कोलमडले
Ganesh Idol
Ganesh IdolPudhari
Published on
Updated on

पुणे: हजारो किलोमीटर दूर असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतील अस्थिरतेचा 'रंग' यंदा पुण्यातील गणपती बाप्पालाही चढला आहे. आखातातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात निर्माण झालेल्या चढ-उतारांचा फटका पेंट उद्योगाला बसला असून, गणेशमूर्ती रंगविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही रंगांच्या दरात वर्षभरात किलोमागे तब्बल ४५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यात पीओपी, थिनर, ब्रश, वाहतूक आणि कारागिरांची मजुरीही महागल्याने मूर्तिकारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी, यंदा गणेशमूर्तींच्या किमतीही २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Ganesh Idol
Pune Ganeshotsav DJ Dolby: डीजेच्या दणदणाटापेक्षा ढोल-ताशांचा निनादच गणेशोत्सवाची खरी ओळख!

मूर्तिकारांचे आर्थिक गणित कोलमडले

बाप्पाचे डोळे रेखाटण्यापासून पीतांबर, शेला, मुकुट, दागिने आणि आसनावरील नक्षीकामापर्यंत प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या रंगछटा वापरल्या जातात. छोट्या घरगुती मूर्तींसाठी रंग कमी लागत असला, तरी सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींच्या रंगकामासाठी अनेक किलो रंग लागतो. त्यामुळे रंगांच्या दरातील काहीसे रुपयांची वाढही मोठ्या मूर्तींच्या उत्पादन खर्चात हजारो रुपयांची भर घालत आहे. पेंटनिर्मितीसाठी लागणारे सॉल्व्हेंट, रेजिन, बाइंडरसह अनेक घटक पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उद्योगाशी निगडित आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्यातील अस्थिरतेचा परिणाम या कच्च्या मालावर होत आहे. त्याचा फटका पुढे पेंट उत्पादकांपासून विक्रेते आणि मूर्तिकारांपर्यंत पोहोचत असल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Ganesh Idol
Pune Ganeshotsav Noise Pollution: गणेशोत्सवात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मंडळांची गय नाही; नियम मोडल्यास थेट गुन्हा!

'गोल्डन' झळाळीही महागली

मूर्तीच्या मुकुट-दागिन्यांना झळाळी देणाऱ्या गोल्डन पावडरचा किलोचा दर २ हजारांवरून २ हजार ४५० रुपयांवर पोहचला आहे. गोल्डन ऑईलचा लिटरचा दर २७० वरून ३८० रुपये झाला आहे. ऑईल बॉण्डच्या २० किलो पॅकसाठी पूर्वी ९०० रुपये मोजावे लागत होते; आता तो ११०० रुपयांवर गेला आहे. बॉडी स्पेशल प्लास्टिक रंगाचा २० किलोचा दरही ६२०० वरून ७२०० रुपये झाला आहे.

Ganesh Idol
Noise Pollution Rules: ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचा बडगा कधी उगारणार?; ‘नियमभंग करणाऱ्यांना शिक्षा किती जणांना झाली?’

मूर्ती आकर्षक दिसण्यासाठी रंगकामात तडजोड करता येत नाही. मात्र, यंदा रंगांबरोबर पीओपी, थिनर, ब्रश आणि मजुरीही महागली आहे. प्रत्येक मूर्तीमागचा उत्पादन खर्च वाढला आहे. संपूर्ण वाढ ग्राहकांवर टाकणे शक्य नसल्याने मूर्तिकारांनाही काही भार सहन करावा लागत आहे.

गणेश कुंभार, मूर्तिकार, गणेश आर्ट्‌स, लोहगाव

Ganesh Idol
Baramati bribe case : पाच लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

गोल्डन पावडरपासून विविध शेडपर्यंत जवळपास सर्वच रंग महागले आहेत. मोठ्या मूर्तींसाठी रंगाचे प्रमाण जास्त असल्याने खर्चातील वाढ हजारोंमध्ये जाते. त्यात वाहतूक आणि कारागिरांची मजुरी वाढल्याने यंदा मूर्तींच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

अक्षय खेडकर, मूर्तिकार, अनुप्रिया आर्ट्‌स, कसबा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news