Smita Jadhav: पुणे पदवीधर निवडणूक: डॉ. स्मिता जाधव यांना फायनान्स कर्मचारी असोसिएशनचा पाठिंबा

असोसिएशनचे अध्यक्ष सागर भांड यांची माहिती; पाच जिल्ह्यांतील पदवीधर मतदारांच्या पाठिंब्याचा दावा
Dr. Smita Yogesh Jadhav
Dr. Smita Yogesh JadhavPudhari News
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे पदवीधर निवडणूक मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना फायनान्स कर्मचारी असोसिएशनकडून पाठिंबा देण्यात आला आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सागर भांड यांनी दिली आहे.

Dr. Smita Yogesh Jadhav
Sachin Bangar: पदवीधर निवडणुकीत सचिन बांगर यांची माघार; स्मिताताई जाधव यांना पाठिंबा

डॉ. स्मिता जाधव या उच्चशिक्षित उमेदवार असून, पदवीधारकांच्या प्रश्नांसाठी त्या पाठपुरावा करून प्रश्न सोडवू शकतात, याची आम्हाला आशा आहे. केंद्रात आणि राज्यातही भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून पदवीधारकांचे प्रश्न सोडविले जाऊ शकतात.

Dr. Smita Yogesh Jadhav
Pune Mamarao Date Printing Press: पुणे महापालिकेच्या ऐतिहासिक मुद्रणालयाचे अस्तित्व धोक्यात; मामाराव दाते मुद्रणालयाला टाळे

त्यामुळे पदवीधरांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याबरोबर प्रचारातदेखील सहभागी होणार असल्याचे भांड यांनी स्पष्ट केले आहे. फायनान्स असोसिएशनचे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या पाचही जिल्ह्यांत भरपूर पदवीधर मतदार आहेत. त्यांचे एकगठ्ठा मतदान डॉ. स्मिता जाधव यांना दिले जाणार असल्याची ग्वाही असोसिएशनच्या वतीने भांड यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news