PMPML Special Bus Service: पुणे-पिंपरीतील औद्योगिक कामगारांसाठी पीएमपीच्या तीन शिफ्टमध्ये विशेष बससेवा

सकाळी ६, दुपारी ३ आणि रात्री १० वाजता बस सोडण्याचे नियोजन; चाकणसह मोठ्या औद्योगिक कंपन्यांशी चर्चा सुरू
PMPML
PMPMLPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगार आणि कर्मचाऱ्यांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. कंपन्यांच्या कामाच्या वेळा लक्षात घेऊन ऑफ-टाइममध्ये (गर्दी नसलेल्या वेळेत) तीन शिफ्टनुसार विशेष बस चालवण्याचे नियोजन पीएमपीकडून करण्यात येत आहे. या नियोजनामुळे कामगारांना हक्काची आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार असून, पीएमपीच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे.

PMPML
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून; छगन भुजबळ यांचे विधान

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये कंपन्यांचे कामकाज प्रामुख्याने तीन शिफ्टमध्ये चालते. यामध्ये सकाळी ६, दुपारी ३ आणि रात्री १० या वेळा महत्त्वाच्या असतात. नेमक्या याच वेळांमध्ये शहरातील इतर मार्गांवर पीएमपी बसला फारशी गर्दी (पिकअवर) नसते.

PMPML
Pune Theatre Rent Hike: पुण्यातील महापालिका नाट्यगृहांचे भाडे दुप्पट होणार? १३ वर्षांनंतर भाडेवाढीचा प्रस्ताव

त्यामुळे अनेक बस आगारांमध्ये किंवा थांब्यांवर उभ्या असतात. हीच बाब लक्षात घेऊन, ज्या वेळी पीएमपीच्या गाड्यांना प्रवासी नसतात, त्याच वेळेत औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी विशेष बस सोडण्याचा आराखडा तयार केला जात आहे.

PMPML
Sinhgad Educational Institutions: सिंहगडच्या २५ शैक्षणिक संस्थांवर सरकारची कारवाई; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई

मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी पीएमपीची चर्चा सुरू

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पीएमपी प्रशासनाने पावले उचलली आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीसह शहराच्या इतर भागांतील मोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी पीएमपीची चर्चा सुरू आहे. कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांचे निवासस्थान असलेले मार्ग यांचा अभ्यास करून या विशेष गाड्यांचे मार्ग निश्चित केले जाणार आहेत.

PMPML
Bhide Wada Memorial: भिडे वाडा स्मारकाचे मार्च २०२७ पूर्वी उद्घाटन; २०० कोटींच्या निधीची तयारी

औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा या साधारणपणे सकाळी ६, दुपारी ३ आणि रात्री १० अशा तीन शिफ्टमध्ये असतात. नेमक्या याच वेळेत गर्दी नसल्याने शहरातील नियमित मार्गांवर पीएमपीच्या बसेस उभ्या असतात. या बसचा योग्य वापर करून औद्योगिक कामगारांची ने-आण करण्यासाठी विशेष सेवा सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास कामगारांना किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासाची सोय तर होईलच, शिवाय पीएमपीच्या उत्पन्नातही मोठी वाढ होईल.

महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.